मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assembly Election 2021: ममता बॅनर्जींवरील हल्ल्यापासून टेप लीकपर्यंत, पश्चिम बंगाल निवडणुकीतील 5 प्रमुख वाद

Assembly Election 2021: ममता बॅनर्जींवरील हल्ल्यापासून टेप लीकपर्यंत, पश्चिम बंगाल निवडणुकीतील 5 प्रमुख वाद

West Bengal Assembly Election 2021: आज सकाळी आठ वाजल्यापासून पश्चिम बंगालसहित केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केद्रशासित प्रदेश असणाऱ्या पॉंडेचेरीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
कोलकाता, 02 मे: आज सकाळी आठ वाजल्यापासून पश्चिम बंगालसहित (West Bengal Assembly Election 2021) केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दुचेरीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली होती. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अनेक वाद आणि प्रतिवाददेखील झाले आहेत. यामध्ये अगदी वैयक्तिक स्तरावर जाऊन केलेल्या टीकेपासून हिंसाचाराचा देखील समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया पाच प्रमुख विवाद... निवडणूक प्रचारासाठी ममता बॅनर्जीवर बंदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने 12 एप्रिल रोजी 24 तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली होती. केंद्रीय सशस्त्र दलावर त्यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय असंविधानिक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. निवडणूक आयोगानं त्यांच्यावर 12 एप्रिल रोजी रात्री 8 ते 13 एप्रिल रोजी रात्री 8 पर्यंत बंदी घातली होती. ऑडिओ टेप लीक गेल्या महिन्यात भाजपनं गणेश बगेरिया आणि यांचे जवळचे सरकारी अधिकारी यांच्यात झालेला कथित संभाषण ऑडिओ टेप जारी केला होता. भाजपच्या म्हणण्यानुसार, या ऑडिओ टेपमध्ये टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला होता. तर दुसरीकडे टीएमसीनं देखील एक ऑडिओ टेप जारी केला होता. ज्यामध्ये भाजप नेते मुकुल रॉय आणि शिशिर बाजोरिया यांच्यात कथित संभाषण सुरू होतं. या ऑडिओ टेममध्ये दोघंही निवडणूक आयोगाला आपल्या बाजूने ओढण्याबाबतच्या योजनेची चर्चा करत होते. ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला 10 मार्च रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम याठिकाणी हल्ला झाल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला होता. नंदीग्राममधून उमेदवारी मिळाल्यानंतर काही तासांतच हा अपघात घडला होता. यावेळी टीएमसीनं सांगितलं की, पक्षप्रमुखांवरील हा हल्ला सुनियोजित कटाचा एक भाग आहे. ही घटना नंदीग्रामच्या बिरुलिया बाजारात घडल्याचा दावा करण्यात आला होता, त्यात ममता बॅनर्जीच्या एका पायाला दुखापत झाली होती. यानंतर भाजप आणि टीएमसीमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. नरेंद्र मोदींच्या फोटोवरून वाद मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रसिद्ध केला जात होता. त्याचबरोबर अनेक पेट्रोल पंपावर त्यांचे होर्डिंग लावण्यात आले होते. यानंतर निवडणूक आयोगानं हे होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले होते. शिवाय आरोग्य मंत्रालयाला देखील पत्र लिहून आचार संहितेचं पालन करण्याचा सल्ल दिला होता. भाजप कार्यालयाबाहेर मोर्चे पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यातील भाजप कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यांनी मोर्चे आणि आंदोलनं केली होती. भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार असणाऱ्या अशोक लाहिरी यांना अलीपूरद्वारातून नामांकन देण्यात आलं होतं. यावेळी भाजप जिल्हाध्यक्षांनी म्हटलं होतं की, लाहिरीबद्दल कधीही ऐकलं नाही शिवाय त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही.
First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, West Bengal Election

पुढील बातम्या