भाजप उमेदवाराच्या संपत्तीत 18 महिन्यांत झाली 185 कोटींचा वाढ

भाजप उमेदवाराच्या संपत्तीत 18 महिन्यांत झाली 185 कोटींचा वाढ

कर्नाटक पोटनिवडणूक: होसकोट मतदारसंघातून एमटीबी नागराज यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

बंगळुरू, 18 नोव्हेंबर: कर्नाटकात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. होसकोट मतदारसंघातून काँग्रेसचे बागी विरुद्ध भाजपचे एमटीबी नागराज यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीत उमेदवाराला आपल्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे. या माहितीनुसार एमटीबी नागराज यांच्या जवळ आता 1223 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस-जेडीएस यांच्या आघाडीतून जे सरकार स्थापन करण्यात आलं होतं त्यामध्ये नागराज हे मागील 18 महिन्यांपासून मंत्री म्हणून कार्यरत होते. कार्यकाळात जवळपास त्यांच्या संपत्तीमध्ये 185 कोटींची वाढ झाली आहे.

कर्नाटकात 5 डिसेंबरला 15 जागांवर पोटनिवडणूक पार पडणार आहे. आपल्या निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एमटीबी नागराज यांच्य़ा संपत्तीत 185 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे आताच्या घडीला 1223 कोटींची संपत्ती आहे. एप्रिल 2018 मध्ये त्यांच्याकडे एकूण 1063 कोटी इपये एवढी संपत्ती होती.

भाजप प्रवक्ते मधू सूदना यांच्या म्हणण्यानुसार नागराज हे देशातील अतिश्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या पत्नी आणि कुटुंबियांच्या संपत्तीबाबतही खुलासा केला आहे. 66 वर्षीय नागराज यांना बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील प्रतिष्ठीत असलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर 2018 साली काँग्रेस-जेडीएसच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेला विचारा; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

नागराजसह अन्य 16 आमदारांना कॉंग्रेस-जेडीएस सरकारविरूद्ध बंडखोरी केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले होते.या आमदारांच्या बंडखोरीनंतर कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस युती सरकार पडले. सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानं पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 18, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading