"Chutia ही शिवी नाही", आडनावामुळे ऑनलाइन नोकरीचा अर्ज नाकारल्याने महिला वैतागली

Chutia आडनाव असलेल्या आसामी महिलेने (Assam Woman) सोशल मीडियावर (social media) आपला राग व्यक्त केला.

  • Share this:

गुवाहाटी, 22 जुलै : कोणताही अर्ज ऑनलाइन करताना चुकीच्या शब्दामुळे तुम्हाला तो वारंवार भरावा लागत असेल तर तुम्हाला किती राग येतो. मात्र जर तो शब्द चुकीचा नसून योग्य असेल आणि त्यामध्ये तुम्ही काहीच बदल करू शकत नाही, असं असतानाही तुमचा अर्ज स्वीकारला जात नसेल तर मग तुमच्या रागाचा पारा चढणारच ना. असंच काहीसं घडलं ते आसाममधील महिलेच्या बाबतीत.

प्रियांका असं या महिलेचं नाव असून तिचं आडनाव Chutia असं आहे. जे वाचल्यानंतर ती एक शिवी असल्याचं लक्षात येईल आणि याच कारणाने तिचा नोकरीसाठी ऑनलाइन अर्जही स्वीकारला जात नव्हता.

प्रियांका आसामच्या गोगामुख शहरात राहणारी आहे. तिनं कृषी अर्थशास्त्र आणि शेती व्यवस्थापनात पदवी मिळवली आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( National Seed Corporation Limited) ती नोकरीसाठी प्रयत्न करत होती. NSCL च्या वेबसाइटवरून जॉबसाठी अॅफ्लिकेशन करताना वारंवार तिचं आडनाव नाकारलं जात होतं. Chutia हा एक अपशब्द असल्याने सॉफ्टेवअरमध्ये तरुणीचं नाव रिजेक्ट केलं जात होतं. आडनावात अपशब्द वापरू नका योग्य शब्द वापरा असा मेसेज सॉफ्टवेअरमार्फत येत होता.

आधीच आपल्या आडनावाबाबत लोकांना स्पष्टीकरण देऊन नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करतानाही त्याच समस्येला तोंड द्यावं लागल्याने महिला वैतागली. अखेर तिनं फेसबुकवर आपला राग व्यक्त केला.

हे वाचा - रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी महिलाच; देशातील एकमेव लेडीज स्पेशल कोविड सेंटर पुण्यात

प्रियांका म्हणाली, "नोकरीसाठी माझं अ‍ॅप्लिकेशन नाकारण्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही तर माझं आडनाव आहे. पोर्टल मला सातत्याने नावात योग्य शब्द वापरण्यास सांगत आहे. मला खूप वाईट वाटतं आहे आणि ही शिवी नाही तर माझा एक समाज आहे, याबाबत लोकांना स्पष्टीकरण देऊन मी आता वैतागले"

Chutia हा आसाममधील खूप जुना असा एक समाज आहे. याचा उच्चार सुटिया असा केला जातो. या आडनावाबाबत आणि समाजाबाबत सर्वांना माहिती असावी यासाठी आपण आपला अनुभव फेसबुकवर मांडल्याचं तिनं सांगितलं.

हे वाचा - लॉकडाऊन संपताना वाढतेय नोकरीची संधी, 'या' क्षेत्रात मिळणार बम्पर जॉब्स

यानंतर प्रियांकाने NSCL तिला होत असलेल्या या समस्येबाबत लेखी कळवलं. संस्थेने त्याची दखल घेतली आणि तिचा अर्ज स्वीकारला.

Published by: Priya Lad
First published: July 22, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या