मराठी बातम्या /बातम्या /देश /

उच्च गायींची पैदास करण्यासाठी आर्टिफिशियल इनसेमिनेशनचा विचार, हिमंता बिस्व सरमा यांची माहिती

उच्च गायींची पैदास करण्यासाठी आर्टिफिशियल इनसेमिनेशनचा विचार, हिमंता बिस्व सरमा यांची माहिती

गायींची पैदास करण्यासाठी राज्यात लवकरच गोवंशातील जनावरांबाबत आर्टिफिशयल इनसेमिनेशन (Artificial Insemination) करण्याचा सरकारचा विचार आहे.

गायींची पैदास करण्यासाठी राज्यात लवकरच गोवंशातील जनावरांबाबत आर्टिफिशयल इनसेमिनेशन (Artificial Insemination) करण्याचा सरकारचा विचार आहे.

गायींची पैदास करण्यासाठी राज्यात लवकरच गोवंशातील जनावरांबाबत आर्टिफिशयल इनसेमिनेशन (Artificial Insemination) करण्याचा सरकारचा विचार आहे.

दिसपूर, 16 जुलै: ‘ उच्च दर्जाच्या जातीच्या गायींची पैदास करण्यासाठी राज्यात लवकरच गोवंशातील जनावरांबाबत आर्टिफिशयल इनसेमिनेशन (Artificial Insemination) करण्याचा सरकारचा विचार आहे. सेक्स सॉर्टेड सीमेन (Sex Sorted Semen) या तंत्राचा वापर करून केवळ गायींना जन्म द्यायचा असं करता येऊ शकतं. त्यामुळे बैलांना जन्म न दिल्याने बैलांना कत्तलखान्यांमध्ये जाण्यापासून वाचवता येईल. त्यामुळे आम्ही हे तंत्र वापरून भविष्यात फक्त उच्च दर्जाच्या जातीच्या गायी पैदा करण्याबाबत विचार करत आहोत, ’ असं मत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा (CM HIMANTA BISWA SARMA) यांनी व्यक्त केलं आहे. एआययूडीएफचे (AIUDF) आमदार अमिनुल इस्लाम यांनी विधानसभेत विचारलेल्या विशेष तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडल्याचं पीटीआयने वृत्तात म्हटलं आहे.

सरमा म्हणाले, ‘ सेक्स-सॉर्टेड सीमेन या तंत्रज्ञानात जन्माला येणाऱ्या जनावराचं लिंग कुठलं आहे हे आधीच समजतं. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरून आम्ही आसाममध्ये लवकरच आर्टिफिशियल इनसेमिनेशन सुरू करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की 10 ते 20 वर्षांनंतर गोवंशात फक्त गायीच (Only Cow) जन्म घेतील बैल (No Bulls) जन्मणारच नाहीत. सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर करून आपण आर्टिफिशियल इनसेमिनेशन करू शकतो असं राज्याच्या व्हेटर्नरी विभागाच्या वतीने मला सांगण्यात आलं आहे. ’

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसह 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला 'हा' सल्ला

‘हिंदू परंपरेत किंवा प्राचीन इतिहासात फक्त कामधेनू या दूध देणाऱ्या गायीचा उल्लेख आढळतो. म्हणजेच त्या काळातही गायींची संख्या जास्त आणि बैलांची संख्या कमी असू शकते. सामान्यपणे शेतकरी बैलांना कसायाला देतात त्यामुळे आता राज्यात पोलीस सतर्क आहेत. कसायाकडे जाणाऱ्या गायींना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून राज्यातल्या चहाच्या मळ्यांमध्ये (Tea Gardens) जागा उपलब्ध असल्याने तिथं गोशाळा बांधण्यात येणार आहेत. गायींचं शेण हे नैसर्गिक खत म्हणून चहाच्या मळ्यांमध्ये वापरण्यात येणार आहे. ’ भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये कामधेनू या गायीचा उल्लेख आढळतो. ही गाय त्याच्या मालकाच्या सर्व इच्छा पूर्ण करायची. त्यामुळे अनेकदा तिचा दाखला दिला जातो.

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना केली 'ही' विनंती

कत्तलखान्यांकडे जाणाऱ्या गायींना पकडून त्यांची योग्य व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून पुन्हा एकदा सांगितलं. ते म्हणाले, ‘पोलिसांनी पकडलेल्या जनावरांचा प्रश्न गंभीर आहे पण त्यापासून पळ काढून उपयोग नाही तर त्याचा उपाय शोधायला हवा. ’ आसाम सरकारने आसाम कॅटल प्रीव्हेन्शन बिल 2021 (Assam Cattle Preservation Bill, 2021) हा कायदा केला आहे.

First published:

Tags: Assam, Cow science