• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Shocking! परीक्षा हॉलमध्ये शॉर्ट्स घालून आल्याने तरुणीसह धक्कादायक वागणूक

Shocking! परीक्षा हॉलमध्ये शॉर्ट्स घालून आल्याने तरुणीसह धक्कादायक वागणूक

Representational image. ANI

Representational image. ANI

प्रवेश परीक्षेसाठी शॉर्ट्स (Student Wearing Shorts made to wrap a curtain) घालून आल्याच्या कारणावरून एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार आसामच्या (Assam News) तेजपूर शहरात घडला.

  • Share this:
तेजपूर, 17 सप्टेंबर: प्रवेश परीक्षेसाठी शॉर्ट्स (Student Wearing Shorts made to wrap a curtain) घालून आल्याच्या कारणावरून एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार आसामच्या (Assam News) तेजपूर शहरात घडला. परीक्षेसाठी कोणताही ड्रेस कोड जाहीर केलेला नसतानाही तिला फुल पँट घालून आल्यासच परीक्षा देता येईल, असं परीक्षास्थळी सांगण्यात आलं. शेवटी तिला पडदा गुंडाळून परीक्षा द्यावी लागली. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने संताप व्यक्त केला आहे. 15 सप्टेंबर रोजी जुब्ली तामुली (Jublee Tamuli) नावाची 19 वर्षांची विद्यार्थिनी जोरहाटच्याआसाम कृषी विद्यापीठाची (Assam Agricultural University Exam News) प्रवेश परीक्षा देण्यासाठी तेजपूरमध्ये आली होती. तिला गिरिजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस  या कॉलेजचं परीक्षास्थळ मिळालं होतं. बिस्वनाथ चरियाली (Biswanath Chariali) या तिच्या गावावरून 70 किलोमीटरचा प्रवास करून जुब्ली तिच्या वडिलांसह परीक्षास्थळी आली होती. एवढ्या लांबून येऊनही ती वेळेत परीक्षेला पोहोचली. सुरक्षारक्षकांनीही तिला तपासणी करून आत सोडलं; मात्र परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर तिथल्या Invigilator नी तिला अडवलं. तिने शॉर्ट्स परिधान केलेले असल्यामुळे तिला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मीडिया अहवालानुसार जुब्लीने अशी माहिती दिली की, 'मला कपड्यांविषयीचा हा कॉमन सेन्स नसेल, तर मी आयुष्यात प्रगती कशी करणार, असा सवाल त्यांनी मला विचारला. त्यांनी कोविड प्रोटोकॉलची तपासणी केली नाही, मास्क आहे की नाही हे पाहिलं नाही, तापमानही तपासलं नाही; पण मी शॉर्ट्स घालून आलेय, इकडे त्यांचं लक्ष होतं. हा माझ्या आयुष्यातला सर्वांत अपमानास्पद प्रसंग होता.' हे वाचा-''वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आई-वडिलांना नाही'' 'परीक्षेच्या Admit Card वर कोणत्याही प्रकारच्या ड्रेस कोडचा उल्लेख नव्हता. काही दिवसांपूर्वी याच शहरात झालेल्या 'नीट' परीक्षेलाही मी याच कपड्यांत आले होते. तेव्हा असं काही झालं नव्हतं. शॉर्ट्स घालू नयेत, असे आसाम कृषी विद्यापीठाचेही काही नियम नाहीत. असं असताना हा नियम कोणता,' अशी विचारणा जुब्लीने केली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती फुल पँट घालून आली, तरच प्रवेश देता येईल, असं तिला परीक्षा नियंत्रकांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर ती बाहेर थांबलेल्या आपल्या वडिलांकडे रडत गेली आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. तिचे वडील बाबुल तामुली आठ किलोमीटर अंतरावरच्या बाजारात तिच्यासाठी ट्राउझरआणायला गेले. तोपर्यंत तिला पायावर गुंडाळण्यासाठी पडदा देण्यात आला. तिला अशा तणावाच्या आणि विचित्र परिस्थितीतच परीक्षा पूर्ण करता आली. कारण पेपर लिहिताना तो पडदा सारखा खाली घरंगळत होता. हा प्रकार अन्यायकारक असल्याचं सांगून, जुब्लीने त्यावर काही सवाल उपस्थित केले आहेत. 'प्रत्येकाचे काही कम्फर्ट झोन असतात. मुलाने हाफ पँट घातली, तर कोणाचं काही म्हणणं नसतं. काही पुरुष तर उघड्या अंगानेही सार्वजनिक ठिकाणी फिरतात, त्यावर कोणी काही बोलत नाही; पण एका मुलीने शॉर्ट्स घातली, तर त्याकडे मात्र सगळे जण बोटं दाखवतात. याला काय म्हणायचं?' अशा भावना जुब्लीने व्यक्त केल्या. दरम्यान, परीक्षा स्थळ असलेल्या GIPS संस्थेचे प्राचार्य डॉ. अब्दुल बाकी अहमद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या वेळी कॉलेजमध्ये उपस्थित नसल्याचं मात्र असा प्रकार घडल्याचं समजल्याचं सांगितलं. हे वाचा-कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय 'आमचा त्या परीक्षेशी काही संबंध नाही. आमची संस्था केवळ परीक्षा घेण्यासाठी केंद्र म्हणून भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. Invigilator देखील आमच्या कॉलेजचे नव्हते. परीक्षेला शॉर्ट्ससंदर्भात काही नियम नाही; पण तरीही डेकोरम पाळला जाणं महत्त्वाचं आहे. पालकांना हे अधिक चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया डॉ. अब्दुल बाकी अहमद यांनी व्यक्त केली. दरम्यान, झाल्या प्रकाराबद्दल आपण शिक्षणमंत्री रनोज पेगू (Ranoj Pegu) यांना पत्र लिहिणार असल्याचं जुब्लीने सांगितलं.
First published: