Home /News /national /

आसाममध्ये भयंकर परिस्थिती; 25 लाख नागरिकांना पुराचा फटका, 110 जणांचा मृत्यू

आसाममध्ये भयंकर परिस्थिती; 25 लाख नागरिकांना पुराचा फटका, 110 जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा कहर असताना आसाममधील पुरामुळे परिस्थितीत कठीण झाली आहे

    गुवाहाटी, 19 जुलै : आसाममध्ये पाच आणखी लोकांच्या मृत्यूमुळे पुरासंबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 84 पर्यंत वाढला आहे. तर राज्यातील पूर आणि भुस्खलनमुळे मृतांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 24 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुरामध्ये सर्वाधित 4.53 लाख लोक गोलपाडामधील प्रभावित झाले आहेत. याशिवाय बारपेटामध्ये 3.44 लाख लोक आणि मोरीगावातील 3.41 लाखाहून अधिक लोकांवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्यात शक्य तितकी मदत देणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. पीएम मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी फोनवर पुरासंबंधित परिस्थितीवर चर्चा केली. 33 जिल्ह्यांमध्ये 24 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 25 लाखांहून अधिक लोकांचा फटका सहन करावा लागला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक अधिकाऱ्यांनी सांगितली की सोनोवालच्या लोकांना समोर येणाऱ्या समस्यांशी तोंड देण्यासाठी राज्यात आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांबाबत मोदींना माहिती देण्यात आली. तरी आसाम सरकारकडून पुरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या