Home /News /national /

किती भयंकर आहे ही आग, आसामच्या तेलविहिरीतील अग्नितांडवाचा पाहा VIDEO

किती भयंकर आहे ही आग, आसामच्या तेलविहिरीतील अग्नितांडवाचा पाहा VIDEO

तेलाच्या विहिरीत लागली आग गावात पसरली, 6 जण जखमी

    गुवाहाटी, 10 जून : आसाममधील ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्यानंतर भयंकर आग लागली होती. ही आग गेल्या काही दिवसांपासून धुमसत आहे. 14 दिवसांपासून सुरू असलेल्याा या आगीनं रौद्र रुप धारण केलं असून आता आसपासच्या गावांमध्ये ही आग पसरली आहे. या आगीत 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये ही आग वेगानं पसरत असल्यानं मोठं नुकसान झालं आहे. आसामचे पर्यावरण व वनमंत्री परिमल सुखाबैद्य म्हणाले, आसाममधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण ही आग आता जवळपासच्या गावांमध्ये वेगानं पसरत आहे. या आगीमुळे गावातील 6 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी साधारण एक महिना लागू शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशातलं महत्त्वाचं खनिज तेल उत्पादक केंद्र असलेल्या बघजन ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. गेल्या 14 दिवसांपासून या तेलविहिरीत वायूगळती होत होती. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असतानाच अचानक आग लागली. या आगीचे लोळ आणि धूर अनेक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. हे वाचा-मजुरांबद्दलचे दावे फक्त कागदावरच, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं तेलविहिरीत वायूगळती होऊ लागल्याचं लक्षात येताच गेल्याच आठवड्यात इथून सर्व नागरिकांना आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. कारंजासारख्या उडणाऱ्या या खनित वायूने पेट घेऊ नये म्हणून NDRF चे जवान इथे तैनात होते. या वायूगळतीवर उपाय शोधायला परदेशातून तज्ज्ञांची टीमही इथे हजर झाली होती. पण आता या गॅसने पेट घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आगीचा धोका लक्षात घेऊन हजारो लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून प्राणी आणि 6 जण जखमी झाले आहेत. जखमी प्राण्यांना आणि 6 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा-या राज्यात उद्यापासून स्वस्त होणार दारु, 70% Corona Tax हटवला संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या