गुवाहाटीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला, दोन जणांचा मृत्यू

गुवाहाटीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला, दोन जणांचा मृत्यू

गुवाहाटीमध्ये वर्दळीचं ठिकाण असलेल्या झू रोड परिसरात एका शॉपिंग मॉलसमोर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:

गुवाहाटी, 15 मे : गुवाहाटीमध्ये वर्दळीचं ठिकाण असलेल्या झू रोड परिसरात एका शॉपिंग मॉलसमोर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस आणि सुरक्षा दल दाखल झाले आहेत. हा हल्ला उल्फाकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉपिंग मॉलबाहेर लोकांची ये-जा सुरू होती. याचदरम्यान, काही लोक तेथे पोहोचली आणि त्यांनी मॉलबाहेर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत.


जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिकांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर लगेचच घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.सध्या घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण परिसर बंद केला आहे.

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: assam
First Published: May 15, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या