अशोक सिंघल यांनी गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जाऊन शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील अजूनही समोर येऊ शकला नाही. पण, कालपर्यंत शिंदे यांच्या गटाला भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप होत होता, त्या आरोपाला आता बळ मिळाले आहे. (या राशीला अखेर लाइफ पार्टनर मिळणार; लग्न झालेल्यांनीही जरूर पाहा आजचं राशिभविष्य) विशेष म्हणजे, शिवसेनेनं बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. पदाधिकाऱ्यांपासून ते राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकींचा धडका लावला आहे. सर्व बंडखोर नेत्यांना जी जी पदं दिली होती, त्या पदावरून हटवण्याची मोहिमच सेनेनं हाती घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं दिली आहे, ती सुद्धा काढून घेतले जाणार आहे. सेनेच्या या आक्रमक खेळीमुळे शिंदे गटामुळे खळबळ उडाली आहे. काही आमदार हे या कारवाईमुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढवला आहे. पुढील 30 तारखेपर्यंत हॉटेलमधील बुकिंग वाढवण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा तर, राज्यात ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटही सावध झाला आआहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्लानंतर आता अशा आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुवाहाटीचा मुक्काम वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन होईपर्यंत केंद्रीय सुरक्षा पुरवण्याची रणनीती आखली जात आहे.असम के मंत्री अशोक सिंघल शिवसेना नेता एकनाथ शिंदे समेत महाराष्ट्र के बागी विधायकों से मिलने गुवाहाटी के रैडिसन ब्लू होटल पहुंचे। (25.06) pic.twitter.com/aFMi9G16R7
— ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.