शहीद कर्नलच्या फोनवरून अतिरेकी म्हणाला, सलाम वालेकुम; JK एन्काऊंटरची Inside Story

शहीद कर्नलच्या फोनवरून अतिरेकी म्हणाला, सलाम वालेकुम; JK एन्काऊंटरची Inside Story

शर्मा हे अतिशय धाडसी अधिकारी होते. त्यांना त्यासाठी दोन वेळा अतिशय सन्मानाचं समजलं जाणारं 'वीरचक्र' देण्यात आलं होतं.

  • Share this:

श्रीनगर, 03 मे : देश कोरोनाशी लढत असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस कायम आहे. हंदवाडा जिल्ह्यातल्या चकमकीत आज लष्करा आणि पोलिसांचे 4 अधिकारी शहीद झाले होते. या चकमकिची थरारक माहिती समोर येत असून शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांच्या फोन अतिरेक्यांनी उचलला आणि त्याने दोन वेळा ‘सलाम वालेकुम’ असं म्हटल्याचं समोर आलंय. या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला असून त्यात लष्कर ए तैय्यबाचा टॉप कमांडर हैदर असल्याचंही सिद्ध झालं आहे.

शहीद झालेल्यांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लांस नायक दिनेश आणि जम्मू-कश्मीर पुलिसांचे सब-इंस्पेक्टर शकील काजी यांचा समावेश आहे. शर्मा हे अतिशय धाडसी अधिकारी होते. त्यांना त्यासाठी दोन वेळा अतिशय सन्मानाचं समजलं जाणारं 'वीरचक्र' देण्यात आलं होतं.

हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र त्याच वेळी 4 जणांना शहीद व्हावं लागलं.

BSF जवानाकडून अधिकाऱ्याची हत्या आणि नंतर स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

हंदवाडा इथल्या चांजमुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना घरात ओलीस ठेवलं होतं. ही माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी टीम रवाना झाली. त्यामध्ये 21 राष्ट्रीय राइफल्स यूनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद आणि इतर जवानांचं पथक होतं.

त्यांनी घराला घेरलं आणि कर्नल आणि मेजर यांनी घरात प्रवेश केला. दहशतवाद्यांचा गोळीबार सलग सुरूच होता. त्याला प्रत्युत्तर देत घरात बंदी बनवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात त्यांना यश आलं मात्र नागरिकांची सुटका करताना मेजर सूद आणि कर्नल शर्मा यांना वीरमरण आलं.

कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे

घरात ज्यांच्या नेतृत्वाखाली जावांनांची टीम घुसली होती ते लवकर परत आले नाहीत त्यामुळे बाहेरच्या टीमला काळजी वाटू लागली. गोळीबारामुळे मध्ये गेलेल्या लोकांची संपर्क यंत्रणा बंद पडली होती. शेवटी शर्मा यांच्या फोनवर जेव्हा रिंग करण्यात आली तेव्हा अतिरेक्यांनी फोन उचलला आणि सलाम वालेकुम असं तो म्हणाला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने तसच म्हटलं आणि फोन कट केला अशी माहिती दिली जात आहे.

 

 

 

First published: May 3, 2020, 8:18 PM IST

ताज्या बातम्या