मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘सर्व हिंदू देशभक्त, तर नथुराम गोडसे कोण होता?’,ओवैसींचा भागवतांना प्रश्न

‘सर्व हिंदू देशभक्त, तर नथुराम गोडसे कोण होता?’,ओवैसींचा भागवतांना प्रश्न

 ‘हिंदू हा देशविरोधी नसतो’, असा दावा सरसंघचालक (RSS Chief) डॉ, मोहन भागवत (DR Mohan Bhagwat) यांनी दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशानात केला होता.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 2 जानेवारी:  ‘हिंदू हा देशविरोधी नसतो’, असा दावा सरसंघचालक (RSS Chief) डॉ, मोहन भागवत (DR Mohan Bhagwat) यांनी दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशानात केला होता. धर्माच्या आधारावर देशभक्तीची व्याख्या करणाऱ्या भागवत यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. AIMM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भागवत यांना याबात प्रश्न विचारले आहेत.

ओवैसींचे भागवतांना प्रश्न

‘भागवत उत्तर देणार का:  गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय सांगणार? नेल्ली हत्याकांडांशी (आसाम) संबंधित लोकांबद्दल काय बोलणार? 1984 मधील शिख विरोधी दंगल आणि 2002 मधील गुजरात दंगल यांच्याबद्दल काय बोलणार?’ असा प्रश्न ओवैसींनी भागवतांना विचारला आहे.

ओवैसी पुढे म्हणाले की, “ बहुसंख्य भारतीय, त्यांचा धर्म कोणताही असला तरी ते देशभक्त आहेत, ही समजूत तर्कसंगत आहे. मात्र, आरएसएसची (RSS) कट्टर विचारसणी एकाच धर्माच्या अनुयायींना देशभक्तीचं प्रमाणपत्र देत आहे. अन्य लोकांना आयुष्यभर आपल्याला भारतामध्ये राहयचं आहे, आणि स्वत:ला भारतीय म्हणण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो.’’

काय म्हणाले होते भागवत?

कोणताही हिंदू हा भारतविरोधी असू शकत नाही. तो हिंदू आहे म्हणजे देशभक्त आहे. तो त्याचा मुलभूत स्वभाव आहे,’’असा दावा भागवत यांनी केला होता.  स्वराज्य समजण्यासाठी स्वधर्म समजणं आवश्यक आहे’ या गांधीजींच्या वक्तव्याचा आधारही त्यांनी दिला होता. " हिंदू आहे म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रीस्त असू शकतो, त्याला जागं करायला हवं पण कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही.'' असा भागवतांनी हिंदू आणि देशभक्ती यामधील संबंध स्पष्ट केला होता.

First published:

Tags: Asaduddin owaisi, Rss mohan bhagwat