मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नमंडपात एन्ट्री करताच मागितलं आधार कार्ड, अनेक वऱ्हाडी न जेवताच परतले!

लग्नमंडपात एन्ट्री करताच मागितलं आधार कार्ड, अनेक वऱ्हाडी न जेवताच परतले!

या विचित्र घटनेची गावभरात मोठी चर्चा सुरू आहे.

या विचित्र घटनेची गावभरात मोठी चर्चा सुरू आहे.

या विचित्र घटनेची गावभरात मोठी चर्चा सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 25 सप्टेंबर : अमरोहा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे मुलीकडील पक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली. ज्या वऱ्हाड्यांनी आधार कार्ड दाखवलं, त्यांनात लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली. बाकी ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, अशांना माघारी पाठवण्यात आलं.

यानंतर संतापलेल्या वऱ्हाड्यांनी या सर्व घटनेचा व्हिडीओ शूट केला, सध्या या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. हसनपूर भागातील नवरी घेण्यासाठी वऱ्हाडी पोहोचले होते. मुलीच्या पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जितकी वऱ्हाड्यांची संख्या होती, त्याहून खूप जास्त जणं लग्नाला आले होते. नवरीच्या पक्षाने जेव्हा वऱ्हाड्यांची संख्या पाहिली तर त्यांना धक्काच बसला. आधी नवरदेवाच्या पक्षाने जितके संख्या सांगितली होती, त्यानुसार जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र वऱ्हाड्यांची इतकी मोठी संख्या पाहून वधु पक्षाचे लोक पुरते घाबरले. त्यानंतर आधार कार्डाच्या आधारावर लग्न मंडळपात एन्ट्री देणार असल्याचं ठरवण्यात आलं. त्यामुळे ज्या वऱ्हाड्यांकडे आधार कार्ड होतं, केवळ त्यांनाच लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली.

वाजत-गाजत सासरी गेली, मनसोक्त नाचली पण..; लग्नानंतर सहाव्या दिवशीच नवरीचं भयंकर कांड

शेवटी कळालं की, त्या दिवशी गावात दोन लग्न होती. जेव्हा एका लग्नात जेवण सुरू झालं तर दुसऱ्या लग्नात आलेले वऱ्हाडीदेखील पहिल्या लग्नात जेवणासाठी धावले.

First published:

Tags: Aadhar card, Marriage, Uttar pradesh