SBIकडून वेतन मिळवून द्या, जेट कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदींकडे मागणी

SBIकडून वेतन मिळवून द्या, जेट कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदींकडे मागणी

  • Share this:

 नवी दिल्ली, 28 एप्रिल : कॅन्सर आजारानं त्रस्त असलेले जेट एअरवेजचे कर्मचारी शैलेश सिंह यांनी आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर, कर्मचाऱ्यांना SBIकडून निदान एका महिन्याचं वेतन मिळवून देण्यात यावं, असं आवाहन नॅशनल एव्हिएटर गिल्ड (NAG)कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींना आवाहन

NAGचे अध्यक्ष करण चोप्रा यांनी ई-मेलद्वारे पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली आहे. सोबतच एअरक्राफ्ट्सचं डी जनरेशनदेखील बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 'मानवी आधार लक्षात ठेऊन जेटच्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान एक महिन्याचं वेतन तरी देण्यात यावं. किंगफिशर एअरलाइन्सप्रमाणेच जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती होऊ नये', असं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, जेट एअरवेजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासंदर्भातील कोणतंही आश्वासन दिलं जाऊ शकत नाही. जवळपास 20,000 अधिक कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

ऑक्टोबर 2012मध्ये किंगफिशर एअरलाइन्सचे हजारो कर्मचारी अशाच पद्धतीनं बेरोजगार झाले होते. या कर्मचाऱ्यांना 8 हून अधिक महिन्यांचं वेतन मिळालं नव्हतं. गेल्या 25 वर्षांपासून उड्डाण करणाऱ्या या कंपनीवर 8 हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे.

अखेर शैलेश सिंह यांनी संपवलं आयुष्य

जेटच्या एकूण 16 हजार कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. या नैराश्यामुळेच जेट एअरवेजच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञ शैलेश सिंह यांनी आत्महत्या केली. 45 वर्षांचे शैलेश सिंग यांना कॅन्सर झाला होता. त्यातच आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. शैलेश सिंग हे नालासोपारामध्ये राहत होते. त्यांच्या चारमजली इमारतीच्या गच्चीवरून उडून मारून टाकून त्यांनी आत्महत्या केली.

कॅन्सर आणि आर्थिक चणचण

जेट एअरवेजच्या कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, शैलेश सिंग हे आर्थिक चणचणीला तोंड देत होते. जानेवारी महिन्यापासून जेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे शैलेश सिंग यांना नैराश्य आलं होतं. शैलेश सिंग यांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांना किमोथेरपी करावी लागत होती. त्यातच आर्थिक चणचणीमुळे त्यांना नैराश्य आलं होतं.

कर्जबाजारीमुळे जेट एअरलाइन काही दिवसांपासून बंद आहे. या आर्थिक संकटात आत्महत्येची ही दुर्दैवी घटना घडली आहे. शैलेश सिंग यांचा मुलगाही जेट एअरलाइनमध्येच काम करतो, अशी माहिती या जेट एअरवेज कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.

शैलेश सिंग यांच्यामागे त्यांची पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे. शैलेश सिंग यांच्या मृत्यूनंतर अपघाती निधनाची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

थकलेले पगार

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार मिळायला अजून उशीर लागणार आहे. बँकांकडून अर्थपुरवठा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असं जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटलं आहे. जेटच्या व्यवस्थापनाने बँकांकडून अर्थपुरवठा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य न झाल्यामुळे पगार देणं लांबणीवर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजचे पायलट, इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन विभागातले अधिकारी असे मिळून 16 हजार कर्मचारी आहेत. या सगळ्यांचे पगार जानेवारी महिन्यापासून थकले आहेत.

जेटची विमानं जमिनीवरच

एकेकाळी भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची अत्यंत हलाखीची स्थिती झाली आहे. गेल्या आठवड्यात जेट एअरवेजने आपल्या सगळ्या विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थपुरवठा करण्यास नकार दिल्याने या एअरलाइन कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.

वाचा अन्य बातम्या

शहीद करकरेंच्या मुलीनं अखेर मौन सोडलं, साध्वी प्रज्ञासिंहबद्दल म्हणाल्या...

PM पदासाठी पवारांची राहुल गांधींना चौथ्या क्रमांकाची पसंती, पहिले 3 कोण?

केवळ 10 हजार रुपयांमध्ये फिरुन या गोवा, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वाद

First published: April 28, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या