राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यंत अखेर संपली, राहुल गांधींनी घेतला 'हा' निर्णय

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यंत अखेर संपली, राहुल गांधींनी घेतला 'हा' निर्णय

आज संध्याकाळी 5 वाजता जयपूरमध्ये गहलोत यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे

  • Share this:

राजस्थान, 13 डिसेंबर: राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला अखेर पूर्णविराम लागला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. स्वतः अध्यक्ष राहुल गांधींनी हा निर्णय घेतला आहे.

आज संध्याकाळी 5 वाजता जयपूरमध्ये गहलोत यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका 4 महिन्यांवर आहेत, त्यामुळे राजस्थानमध्ये अनुभवी नेत्याची गरज आहे, असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय. आणि हे राहुल गांधी यांनीही मान्य केलं आहे. याआधी गहलोत यांनी दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भुषवले आहेत. शांत स्वभाव आणि संघटन कौशल्यासाठी ते जाणले जातात.

पण राजस्थानमधलं तरुण नेतृत्त्व सचिन पायलट नाराज झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी पायलट आणि गहलोत दोघांनी नवी दिल्लीत राहुल यांची भेट घेतली. आधी पायलट राहुल यांना भेटण्यास गेले. सर्व 99 आमदारांची इच्छा आहे की मी मुख्यमंत्री व्हावं, असं पायलट राहुल यांना म्हणाले. पण राहुल यांनी तरुण नेतृत्त्वाऐवजी अनुभवी नेत्याला प्राधान्य दिलं.

राजस्थानमध्ये काँग्रेसने 99 जागा जिकून वसुंधरा राजे यांच्या राज्याला खालसा केला. राजस्थानसह काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही सत्ता काबीज केली आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तर छत्तीसगडमध्ये अजून मुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा सुरू आहे.

===========================================

First published: December 13, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading