राजस्थानचे 'पायलट' शेवटी गहलोतच! कधीकाळी निवडणुकीसाठी विकली होती दुचाकी

1980 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक गहलोत यांनी लढवली होती तेव्हा त्यांनी आपल्या प्रचारासाठीचे पोस्टर स्वत: चिपकवले होते

  • Share this:

 अशोक गहलोत हे राजस्थानमधील काँग्रेसचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते. त्यांनी दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद भुषवलं. नेत्यांवर कशी पकड हवी, काम कसं करून घ्यायचं हे अशोक गहलोत यांना चांगलंच माहिती आहे. विशेष म्हणजे गहलोत हे 'मास लिडर' आहे. जनतेमध्ये गहलोत लोकप्रिय नेते आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

 राजकारणात येण्याआधी गहलोत हे जादूगार होते. त्यांचे वडील बाबू लक्ष्मण सिंह गहलोत हे देशातले प्रसिद्ध जादूगार होते. त्यामुळे जादूगार होण्याचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं.

 शाळेत असताना अशोक गहलोत यांनी जादूंच्या खेळाचा कार्यक्रमही घेतला होता. खिश्यात फूल टाकून रुमाल काढणं आणि कबतूर उडवण्यात अशोक गहलोत तरबेज होते.

 अशोक गहलोत यांनी सरदारपुरा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. इथं त्यांच्या पूर्वजांचं घरं आहे. हा मतदारसंघ जोधपूरमध्ये येतो. याच घरात त्यांचा 1951 साली जन्म झाला. या घरातील एक खोली ते खूप भाग्यकार असल्याचं मानतात. याच भागातील जैन वर्धमान स्कूलमध्ये त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं.

 शाळेत असल्यापासून ते स्काउट आणि एनसीसीमध्ये सहभागी होऊन समाज सेवेचं काम करण्यात सहभागी होत होते. तसंच ते वक्तृत्व स्पर्धेतही हिरहिरीने सहभाग घेत होते. काॅलेजमध्ये गेल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. काॅलेजमध्ये असताना छात्रसंघात ते उपमंत्री झाले.

 राजकारणात येण्याआधी त्यांना डाॅक्टर बनण्याची इच्छा होती त्यासाठी त्यांनी जोधपूर महाविद्यालयात प्रवेश घेतला पण यश आलं नाही. त्यामुळे त्यांना बीएससी पदवीवर समाधान मानावं लागलं. बीएससी पदवी मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी अर्थशास्त्र विषयाची निवड केली.

 गहलोत हे महात्मा गांधी यांच्यापासून प्रभावीत होते. 1971 मध्ये त्यांनी बांग्लादेश मुक्तीसंग्रामच्या वेळी गांधीवादी सुब्बाराम शिबिरात सेवा केली. त्यानंतर वर्ध्यात गांधी सेवाग्राममध्ये 21 दिवस भाग घेतला होता.

 काँग्रेससोबत जोडल्यानंतर काही दिवसांमध्येच आणीबाणी लागू झाली होती. आणीबाणीनंतर होणाऱ्या निवडणुकीत आपण पराभूत होऊ या भीतीने काँग्रेसचे नेते पुढे येत नव्हते. गहलोत यांना विचारणा झाली असता त्यांनी लगेच होकार कळवला. निवडणूक लढवण्यासाठी पैशांची अडचण निर्माण झाली. यासाठी त्यांनी आपली दुचाकी विकून टाकली आणि निवडणूक लढवली.

काॅलेजमधून बाहेर पडल्यानंतर नोकरीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. गहलोत यांनी 1972 मध्ये जोधपूरपासून 50 किलोमिटर दूर बियाणांचं दुकान टाकलं होतं. पण त्यातही त्यांना यश आलं नाही. दीड वर्षांत त्यांना दुकान बंद करावं लागलं.

 1980 साली जेव्हा लोकसभा निवडणूक गहलोत यांनी लढवली होती तेव्हा त्यांनी आपल्या प्रचारासाठीचे पोस्टर स्वत: चिपकवले होते. लोकसभा लढवणारे गहलोत हे सर्वात तरुण खासदार होते.

 गहलोत यांच्या राहण्यात अत्यंत साधेपणा आहे. गहलोत यांचा शांत आणि सुस्वभावापणा हा इंदिरा गांधी यांना भावला आणि त्यांनी गहलोत यांना 1982 मध्ये कॅबिनेट मंत्रीपद बहाल केलं. 1984 मध्ये गहलोत राजस्थानमध्ये प्रदेश काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले.

 राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी त्यांनी जीवाच रान केलं आणि गावागावात काँग्रेसला पोहोचवलं. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांच्यासोबतही गहलोत यांचं राजकीय संबंध जवळचे होते. राजस्थानमध्ये सीपी जोशी यांना संधी दिल्यामुळे काही काळ ते नाराज होते पण तरीही त्यांनी पक्षाचे काम नेटाने पुढे नेलं.

 2008 मध्ये काँग्रेसच्या वाईट काळात त्यांनी बसपाच्या सर्व आमदारांना आपल्या पक्षात आणून काँग्रेसला मोठा दिलासा दिला.

 गहलोत यांनी सरदारपुरा मतदारसंघातून 4 वेळा निवडून आले आणि आताही निवडून आले आहे. याआधी त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री भुषवलं आहे. आता तिसऱ्यांना अशोक गहलोत हे राजस्थानने मुख्यमंत्री भुषवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 06:27 PM IST

ताज्या बातम्या