प्रियंकांच्या ‘सिग्नल’नंतरही पायलट यांचं बंडाचं विमान हवेतच, राहुल गांधींना 5 महिन्यात दोन धक्के

प्रियंकांच्या ‘सिग्नल’नंतरही पायलट यांचं बंडाचं विमान हवेतच, राहुल गांधींना 5 महिन्यात दोन धक्के

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधले समजले जात होते. मात्र पक्षात संधीच मिळत नाही आणि निवृत्तीकडे झुकलेल्या नेत्यांनाच पुन्हा पुन्हा संधी मिळत असल्याने त्यांच्या डावलल्याची भावना होती.

  • Share this:

नवी दिल्ली 13 जुलै: राजस्थानमध्य उपमुख्यंत्री सचिन पायलट यांनी हाती घेतलेला आक्रमक झेंडा अजुनही कायम आहे. सचिन पायलट यांचं मन वळविण्यासाठी प्रियंका गांधी यांनी अखेरच्या क्षणी प्रयत्नांना सुरुवात केली आहे. त्यांनी सचिन पायलट यांना समेट करण्याचे निरोपही पाठवले आहेत. मात्र पायलट यांचं बंडाचं विमान मात्र लँड होण्याची शक्यता दिसत नाही. मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी साथ सोडली होती आणि आता सचिन पायलट दूर जात आहेत. पाच महिन्यात हे दोन मित्र दुरावल्यामुळे राहुल गांधी यांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सचिन पायलट यांनी तर आता थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच आव्हान दिलं असून हॉटेल ही काही विश्वास मत दाखविण्याची जागा नाही, विधानसभेत गेहेलोत यांनी विश्वास मत सिद्ध करावं असं आवाहनच त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता विधानसभेत सामना रंगण्याची शक्यता आहे.

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधले समजले जात होते. समवयस्क असल्याने त्यांच्यात मित्रत्वाचं नातंही होतं. मात्र पक्षात संधीच मिळत नाही आणि निवृत्तीकडे झुकलेल्या नेत्यांनाच पुन्हा पुन्हा संधी मिळत असल्याने त्यांच्या डावलल्याची भावना होती.

राहुल गांधी यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालूनही काहीच होत नसल्याने या नेत्यांनी अखेर भाजपची साथ घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस समोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 13, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या