शिवसेना झाली काँग्रेसची हमाल, दे धमाल; भाजप नेत्याचा घणाघात

शिवसेना झाली काँग्रेसची हमाल, दे धमाल; भाजप नेत्याचा घणाघात

शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार किंवा नाही यावर भाजपच्या मनात संभ्रम होता त्यामुळे शेलार यांनी असं ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्वीट डिलीट केलं तरी त्याचे स्क्रिन शॉट्स आता व्हायरल होत आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 09 डिसेंबर : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत आज वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 293 मते तर विरुद्ध 82 मते पडली. महाराष्ट्रात युती तोडल्यानंतर केंद्रात सेनेच्या एकमेव मंत्र्यांने राजीनामा दिल्यानंतर या विधेयकावेळी सेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेने या विधेयकावरून अमित शहांवर निशाणा साधलाय. नागरिकत्व देणाऱ्या निर्वासितांना मतदानाचा हक्क देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपने जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. पण नंतर ते ट्वीट डिलीट केलंय त्यावरून चर्चा सुरू झालीय.

पंकजा मुंडेंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात? काय म्हणाले विनायक मेटे

या विधेयकाला शिवसेनेने सशर्त पाठिंबा देत अमित शहा आणि त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केलीय. ज्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येणार आहे त्यांना मतदानाचा अधिकार मात्र देऊ नका अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय. त्यावर आशीष शेलार म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम हिंदुंसाठी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे. इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा अधिकार नको? अशी त्यांची भूमिका आहे. सत्तेसाठी पाहा कशी कमाल, काँग्रेसचे हमाल, दे धमाल असं ट्वीट शेलार यांनी केलं होतं.

मात्र नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं. शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार किंवा नाही यावर भाजपच्या मनात संभ्रम होता त्यामुळे शेलार यांनी असं ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्वीट डिलीट केलं तरी त्याचे स्क्रिन शॉट्स आता व्हायरल होत आहेत.

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक अत्याचारामुळे 2014 पर्यंत देश सोडून भारतात अलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. यामध्ये हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी धर्मातील लोकांचा समावेश असेल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे हे विधेयक आहे.

First published: December 9, 2019, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading