मराठी बातम्या /बातम्या /देश /

कौतुकास्पद! दिव्यांग अन् दृष्टिदोष असलेल्या मुलींना शिक्षिका देतेय सेल्फ डिफेन्सचे धडे

कौतुकास्पद! दिव्यांग अन् दृष्टिदोष असलेल्या मुलींना शिक्षिका देतेय सेल्फ डिफेन्सचे धडे

कौतुकास्पद! दिव्यांग अन् दृष्टिदोष असलेल्या मुलांना शिक्षिका देतेय सेल्फ डिफेन्सचे धडे

कौतुकास्पद! दिव्यांग अन् दृष्टिदोष असलेल्या मुलांना शिक्षिका देतेय सेल्फ डिफेन्सचे धडे

अलीकडे शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलवर जिल्ह्याच्या राजगड परिसरातल्या खरखडामधल्या प्राथमिक शिक्षिका आशा सुमन यांनी मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्याचा निर्णय घेतला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 ऑक्टोबर: महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून ते अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकंच काय, तर अश्लील भाषा किंवा मीडिया फाइल्स वापरून ऑनलाइन पद्धतीनेही महिलांची हॅरॅसमेंट केली जाते. अशा असुरक्षित ठिकाणांमध्ये शाळा-महाविद्यालयांचाही समावेश होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमुळे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेतल्या शिक्षिकेने अनोख पाऊल उचललं आहे. आशा सुमन असं नाव असलेल्या या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थिनींना, विशेषत: दृष्टिदोष व श्रवणदोष असलेल्या मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडे शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलवर जिल्ह्याच्या राजगड परिसरातल्या खरखडामधल्या प्राथमिक शिक्षिका आशा सुमन यांनी मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये पोलिस विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात आशा सुमन यांनी सहभाग घेतला होता. तिथूनच कोणत्याही शस्त्राचा वापर न करता मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देण्याची प्रेरणा आशा यांना मिळाली.

आशा सुमन यांच्या मते, सामान्य मुलींच्या तुलनेत दृष्टिहीन मुली लैंगिक अत्याचाराला अधिक बळी पडतात. त्या बघू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मुलींसमोरचं आव्हान ओळखून त्यांनी 2019 मध्ये मुंबईत स्वखर्चाने विशेष सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर इतरांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली.

 हेही वाचा: नाकाबंदीत सगळ्यात आधी 'या' बाईक्स थांबवतात पोलीस, ही माहिती तुमच्या कामाची

त्या म्हणाल्या, "मुलींना दिलं जाणारं ट्रेनिंग त्यांच्या दैनंदिन कामांशी संबंधित आहे. त्यांना पंच मारणं, लाथ मारणं, फॉरवर्ड-बॅकवर्ड, हातांच्या मूव्हमेंट्स शिकवल्या जातात. ज्या पद्धतीने धक्का मारून दरवाजा उघडला जातो त्याच पद्धतीने धक्का मारून हल्लेखोरालाही खाली पाडता येतं, अशी सोपी उदाहरणं मुलांना ट्रेनिंगदरम्यान दिली जातात. यामुळे त्या संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम बनतात शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढतो."

शिक्षिका आशा सुमन यांनी गेल्या तीन वर्षांत राज्याच्या विविध भागांतल्या 300हून अधिक मुलींना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग दिलं आहे. बहुतांश मुलींनी राज्याच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या वार्षिक ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. इतर मुलींना त्यांनी अलवरमध्ये ट्रेनिंग दिलं. जयपूरमध्ये, 6 ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत दिव्यांग आणि दृष्टिहीन मुलींसाठी आयोजित शासकीय सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग कॅम्पमध्ये 11 दृष्टिहीन मुलींसह 55 दिव्यांग मुलींना ट्रेनिंग देण्यात आलं. अलवरमधल्या आशा सुमन आणि झालावाड इथले ट्रेनर कृष्णा वर्मा यांनी प्रशिक्षण दिलं.

First published:

Tags: School teacher, Teacher