...आणि आसाराम ढसाढसा रडला

...आणि आसाराम ढसाढसा रडला

न्यायाधीशांनी दोषी ठरवल्यावर त्याचं पूर्ण अवसानच गळालं. तो निर्विकार बसून राम नामाचा जप कर होता. काही वेळानं जेव्हा न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यावेळी त्याचा उरला सुरला बांध फुटला आणि 77 वर्षांचा आसाराम ढसाढसा रडायला लागला.

  • Share this:

जोधपूर,ता.25 एप्रिल: बलात्काराच्या आरोपावरून आसारामला आज शिक्षा सुनावणार जाणार असल्यानं आसाराम कालपासूनच तणावात होता. शिक्षा सुनावण्यासाठी जोधपूरच्या कारागृहातच विशेष न्यायालय तयार करण्यात आलं होतं.

सकाळी जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला निकालाची आठवण करून दिली तेव्हा तो म्हणाला 'होई है वही जो राम रचि राखा!' म्हणजे प्रभू रामाची जी इच्छा असेल तेच होईल, असं त्यानं शांतपणे सांगितलं.

कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर न्यायाधीश आले मात्र आसारामला घेऊन यायला 15 मिनिटं उशीर झाला कारण तो पूजा करत होता. कोर्ट रूममध्ये आल्यानंतर आसाराम हात जोडून न्यायाधीशांना म्हणाला, प्रभू मुझे क्षमा करे, भक्ती मे मै लीन था.

न्यायाधीशांनी दोषी ठरवल्यावर त्याचं पूर्ण अवसानच गळालं. तो निर्विकार बसून राम नामाचा जप कर होता. काही वेळानं जेव्हा न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यावेळी त्याचा उरला सुरला बांध फुटला आणि 77 वर्षांचा आसाराम ढसाढसा रडायला लागला.

यावेळी त्यानं पांढरीशुभ्र लुंगी आणि लांब अंगरखा परिधान केला होता. कपाळावर चंदनही लावलं होतं. आता दोषी ठरवल्यानं आसारामला कैदाचा पोशाख घालावा लागणार आहे. तसच प्रशासन सांगेल ते काम करावं लागणार आहे.

चाडे चार वर्षात जामीनासाठी 12 अर्ज

आसारामला 1 सप्टेंबर 2013 ला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. या चाडेचार वर्षात त्यानं जामीनासाठी 12 अर्ज केले जंग जंग पछाडलं पण त्याला जामीन मिळाला नाही. त्यानं 6 अर्ज ट्रायल कोर्टात, तीन अर्ज राजस्थान हायकोर्टात तर तीन अर्ज सुप्रीम कोर्टात केले होते. पण सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते.

 

First published: April 25, 2018, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading