आसाराम 10 हजार कोटींचा मालक! काय होणार आता या संपत्तीचं?

आसाराम 10 हजार कोटींचा मालक! काय होणार आता या संपत्तीचं?

ही संपत्ती आहे 10 हजार कोटींची. एकूण 400 आश्रमांचा तो मालक आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयानं या संपत्तीचं काय होणार, असा सवाल उपस्थित होतो.

  • Share this:

25 एप्रिल : अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणी न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेल्या आसाराम बापूला न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आहे. पण त्याच्या जन्मठेपेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यातला मुख्य प्रश्न त्याच्याकडे असलेली करोडोंची संपत्ती. ही संपत्ती आहे 10 हजार कोटींची. एकूण 400 आश्रमांचा तो मालक आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयानं या संपत्तीचं काय होणार, असा सवाल उपस्थित होतो.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, 2008-09मध्ये किमान 2300 करोड रूपयांची संपत्ती आसारामने आयकर विभागापासून लपवून ठेवली होती. ही संपत्ती रियल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेयर्स, शेतकरी विकास पत्र आणि फिक्स्ड डिपाॅझिट स्वरूपात गुंतवलेली होती.

या सर्व संपत्तीतील सर्वात जास्त गुंतवणूक ही कोलकात्यातील 7 कंपन्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या या संपत्तीवरून आसारामने आतापर्यंत भक्तीच्या नावे अनेकांना लुटलं असेल असं म्हणायला हरकत नाही.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, आसाराम आपल्या शिष्यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या बिल्डर्सना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करायचा. प्रति महिना 1 ते 2 टक्के याप्रमाणे व्याजाने नगदी पैसे देण्याचा त्याचा धंदा होता. आता हा धंदा पुढे त्याचे शिष्य चालवणार का असा सवाल उपस्थित होतो.

आसाराम आणि त्याच्या शिष्यांनी 1991-92पासून पूर्ण भारतात जवळजवळ 1400पेक्षा जास्त लोकांना व्याजानं पैसे दिलेले आहेत. त्याचा एकंदरीत आकडा बघता तो 3800 कोटींच्या वरती आहे. आणि सुरक्षेच्या कारणास्तव तो त्यांच्याकडून पोस्ट डेटेड चेक्स, प्रॅमिसरी नोट्स आणि जमिनीचे कागदपत्रं जमा करून घ्यायचा. असं सांगण्यात येतं की, विविध योजनांचा वापर करून तो आश्रमाला मिळालेले दान लपवून ठेवायचा.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 03:27 PM IST

ताज्या बातम्या