News18 Lokmat

आसाराम प्रकरण : 4 वर्ष घाबरत काढली पण आता दिलासा मिळाला - पीडितेचे वडील

मागील चार वर्ष खुप घाबरत गेली पण आता न्यायालयाच्या निकालाने आनंद झाला आहे. असं म्हणत निकालाबद्दल पीडितेच्या वडिलांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:19 PM IST

आसाराम प्रकरण : 4 वर्ष घाबरत काढली पण आता दिलासा मिळाला - पीडितेचे वडील

25 एप्रिल : लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू २०१३च्या बलात्कार प्रकरणी दोषी घोषित केलाय. जोधपूरच्या विशेष एससी एसटी कोर्टानं निर्णय दिला आहे. मागील चार वर्ष खुप घाबरत गेली पण आता न्यायालयाच्या निकालाने आनंद झाला आहे. असं म्हणत निकालाबद्दल पीडितेच्या वडिलांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

आसाराम बापू बलात्कार प्रकरणात पीडित मुलीचे वडील चार वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहेत. आणि अखेर 4 वर्षांनंतर न्यायालयातून त्यांना न्याय मिळाला आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली. याबद्दल त्यांनी न्यायालयाचे, पोलिसांचे आणि सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

'पण या न्यायासाठी आम्हाला खुप लढावं लागलं. आम्हाला इतक्या धमक्या दिल्या. या प्रकरणाची साक्ष देणाऱ्यांचा जीव घेतला गेला, काहींचे अपहरण झाले, खरंतर या सगळ्यांचा आज विजय झाला' अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.

माझ्या मुलीने आम्ही खुप काही झेललं आहे. आम्हाला इतका त्रास देण्यात आला की, आम्हाला घराच्या बाहेरही निघता येत नव्हत. दिवसभर पोलिसांच्या कडक सुरक्षेत आम्ही जगत होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...