Home /News /national /

Cyclone Asani: अंदमान-निकोबारमध्ये 'असनी' चक्रीवादळ धडकलं, अनेक ठिकाणी सुसाट वाऱ्यासह कोसळणार पाऊस

Cyclone Asani: अंदमान-निकोबारमध्ये 'असनी' चक्रीवादळ धडकलं, अनेक ठिकाणी सुसाट वाऱ्यासह कोसळणार पाऊस

Cyclone Asani Latest Update: आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रविवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ 'असनी' (Asani cyclone) रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman Nicobar) येऊन धडकलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 मार्च: आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रविवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे.  2022 मधलं पहिलं चक्रीवादळ 'असनी' (Asani cyclone) रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman Nicobar) येऊन धडकलं आहे. त्यामुळे आज परिसरातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज असनी चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department – IMD) ने माहिती दिली आहे की, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व आणि ईशान्येकडं सरकलं आहे. रविवारी ते आणखी तीव्र झालं असून त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. हे चक्रीवादळ रविवारी अंदमान बेटांवर धडकलं असून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळला आहे. हेही वाचा-पिंपल्स घालवण्यासाठी हे 3 स्पेशल हर्बल ड्रिंक्स घेऊन पाहा; लगेच दिसेल परिणाम शनिवारी सायंकाळपर्यंत आग्नेय आणि दक्षिण अंदमान समुद्रावर निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र 12 किमी प्रतितास वेगानं उत्तरेकडे सरकत आहे. दुसरीकडे, वादळामुळे पोर्ट ब्लेअर आणि आसपासच्या बेटांदरम्यान चालणाऱ्या सर्व जहाजांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. तसेच या वादळात कोणी प्रवासी अडकले तर त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले असून 03192-245555/232714 आणि टोल-फ्री क्रमांक 1-800-345-2714 यावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हेही वाचा-कडाक्याच्या उन्हाळ्यातही रहाल एकमद फिट आणि हेल्दी; फक्त या गोष्टी जपा अंदमान आणि निकोबारनंतर हे वादळ उत्तरेकडे सरकू शकतं, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. रविवारी त्याची तीव्रता अधिक होती. आज त्याचं चक्रीवादळात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हे वादळ 22 मार्च रोजी उत्तर दिशेने पुढे सरकून म्यानमार-दक्षिण-पूर्व बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. हेही वाचा-कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो हवामान खात्यानं मच्छिमारांना 22 मार्चपर्यंत बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि उत्तर-पूर्व भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. वादळाचा प्रभाव पाहता अंदमान आणि निकोबारचे मुख्य सचिव जितेंद्र नारायण यांनी 22 मार्चपर्यंत या भागातील सर्व पर्यटन उपक्रमांवर बंदी घातली आहे. पोर्ट ब्लेअरहून आसपासच्या बेटांवर समुद्रमार्गे जाणारी सेवा बंद करण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Weather forecast, Weather update

    पुढील बातम्या