नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : भारताने केलेल्या Air Strikeवर MIM चे खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय हाईदलाचं अभिनंदन केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन, तीन दिवसांमध्ये अशी कारवाई होईल अशी अपेक्षा होतीच असंही ते म्हणाले.
ओवेसी पुढे म्हणाले, "परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही कारवाई दहशतवाद्यांविरूद्धची असल्याच म्हटलं आहे. सरकारने अशी कारवाई फार पूर्वीच करायला पाहिजे होती. आम्ही सरकारसोबत आहोत. आता मसूद अझहर आणि हाफीज सईद यांना पकडण्यासाठी सरकारने कारवाई केली पाहिजे."
A Owaisi: Was expecting this sort of response within 2-3 days after Pulwama blast. Welcome this. We stand with govt. Though Foreign Secy called it non-military action,it's a step I was expecting govt will take long time back. I hope govt will now go after Masood Azhar&Hafiz Saeed pic.twitter.com/eYgHAfrt7c
— ANI (@ANI) February 26, 2019
राहुल गांधी
भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं 1 हजार किलोचा बॉम्ब दहशतवाद्यांच्या तळावर फेकला. दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर 'भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम' असं ट्विट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं.
शरद पवार
माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवाई दलाला सलाम केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधून ज्या दहशतवादी कारवाया केल्या जातात त्याचा भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिलं असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.