केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ओवेसींनी लोकसभेत फाडलं CAB विधेयक

केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ओवेसींनी लोकसभेत फाडलं CAB विधेयक

  • Share this:

नवी दिल्ली 09 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत आज वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. तर या विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विधेयकावर AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र आक्षेप घेतला. हे विधेयक या देशाची दुसरी फाळणी करणारं आहे. हिटरलपेक्षाही वाईट असं हे विधेयक असून सरकारने हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत असतानाच त्यांनी आपल्या हातात असलेली विधेयकाची कॉपी फाडून टाकली. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावर तीव्र आक्षेप घेत ही कृती संसदेचा अपमान करणारी असल्यांचं सांगितलं. त्यानंतर ओवेसींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं मात्र माफी मागतिली नाही. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. उद्या राहिलेली चर्चा होऊन या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे.

...आणि खासदार संजय राऊतांनी सांगितला सत्ता स्थापनेचा थरार!

या विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शिवसेनेची भूमिका मांडली. तसा हा मुद्दा शिवसेनेसाठी संवेदनशील आहे. मात्र नव्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेने या विधेयकावर वेगळी भूमिका घेत अमित शहांना चांगलंच सुनावलं. हे विधेयक योग्य असलं तरी त्यामागची अमित शहांची भूमिका योग्य नाही.

त्यांच्या मनात काहीतरी वेगळच आहे असंही राऊत यांनी सांगत शहांना खडे बोल सुनावले. राऊत म्हणाले, नुसते कायदे करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केलं. आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं हे पहिले सांगा आणि नवीन विधेयक आणा. ज्या समुदायांच्या लोकांना तुम्ही नागरिकत्व देऊ इच्छिता असे किती लोक भारतात आहेत याचा आकडाही तुम्ही देऊ शकला नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या