सुंजवान हल्ल्यातील शहीद 7 जवानांपैकी 5 जवान मुस्लिम -ओवेसी

'सुंजवानमध्ये लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लोकांनी मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेऊ नये'

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2018 09:59 PM IST

सुंजवान हल्ल्यातील शहीद 7 जवानांपैकी 5 जवान मुस्लिम -ओवेसी

13 फेब्रुवारी : सुंजवानमध्ये लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लोकांनी मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेऊ नये, आपले सात जवान शहीद झाले त्यामध्ये पाच जवान हे मुस्लिम होते असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी केलंय.

सुंजवान हल्ल्यात जे सात जवान शहीद झाले आहेत त्यामध्ये पाच जवान हे मुस्लिम जवान होते. आता यावर कुणी काही बोलत नाही. यातून लोकांनी धडा घेतला पाहिजे. जे मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेतात,जे लोकं आजही मुस्लिमांना पाकिस्तानी मानतात असा टोलाही ओवेसींनी लगावाल.

ओवेसींनी जम्मू-काश्मीर सरकारवरही हल्ला चढवला. भाजप आणि पीडीपी दोन्ही पक्ष मलाई खात आहे. हे त्यांचं अपयश आहे. आतापर्यंत नाटकं करणारी ही दोन्ही पक्ष आता जबाबदारी घेणार की नाही असा सवाल ओवेसींनी केला.

दरम्यान, सुंजवान हल्ल्यात 6 जवान शहीद झाले तर 1 स्थानिक नागरिकाचा मृत्यू झालाय. लष्कराने या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. शहीद जवानांमध्ये मदन लाल चौधरी, मोहम्मद अशरफ, हबीबुल्लाह कुरैशी, इकबाल शेख, मंजूर अहमद, राकेश चंद्र यांचा समावेश आहे. तर शहीद जवान इकबाल शेखचे वडील मोहिद्दीन शेख यांचाही मृत्यू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close