गोडसेचे वंशज अद्याप जिंवत आहेत, तेच मला गोळ्या घालतील; औवैसींच्या वक्तव्याने खळबळ!

गोडसेचे वंशज अद्याप जिंवत आहेत, तेच मला गोळ्या घालतील; औवैसींच्या वक्तव्याने खळबळ!

AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन औवैसी (Asaduddin Owaisi) यांनी कलम 370वरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरला(Jammu-Kashmir) विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 (Article 370)हटवल्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वात आघाडीवर असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्ताहुदुल मुस्लिमिन अर्थात AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन औवैसी (Asaduddin Owaisi) यांनी कलम 370वरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये संचारबंदी आणि अन्य बंदी घातली आहे त्यामुळे तेथील परिस्थिती प्रचंड खराब झाली असल्याचा आरोप औवैसी यांनी केला.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना औवैसी म्हणाले, मला पूर्ण विश्वास वाटतो की एक दिवस मला देखील गोळी घातली जाईल. देशात असलेले गोडसेचे वंशज असे करू शकतात. सध्या काश्मीरमध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. तेथे फोन चालू आहे ना लोकांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी घटनेचे पालन करणे आवश्यक आहे आणि तातडीने काश्मीरमधील संचारबंदी मागे घेतली पाहिजे. आज जे जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबत झाले आहे तेच नागालँड, मिझोराम, आसाम आणि हिमाचल प्रदेशच्या लोकांसोबत देखील होऊ शकते, असा इशारा औवैसी यांनी दिला.

औवैसी यांनी केलेल्या आरोपामुळे पाकिस्तानला मदत मिळत आहे, असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, अशा आरोप तेच लोक करतात जे स्वत: देशविरोधी आहे आणि मला अॅन्टी नॅशनल म्हणतात.

रजनीकांत यांच्या वक्तव्याचा समाचार

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यावरून काहीच दिवसांपूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले होते. या निर्णयानंतर रजनीकांत यांनी मोदी-शहा जोडीला अर्जुन-कृष्णाची जोडी असे म्हटले होते. रजनीकांत यांच्या या वक्तव्यावर बोलताना औवैसी म्हणाले, मोदी आणि शहा हे अर्जुन-कृष्ण असतील तर मग पांडव आणि कौरव कोण आहेत? देशात काय पुन्हा महाभारत सुरू करायचे आहे का असा सवाल त्यांनी विचारला.

पूरग्रस्त महाराष्ट्र आणि केरळला दिली मदत

औवैसी यांनी पूरग्रस्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. औवैसी यांनी ही रक्कम थेट मुख्यमंत्री मदत निधीत जमा करणार आहेत. महाराष्ट्रात आलेल्या पूरात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केरळमधील 14  जिल्ह्यात आलेल्या महापूरात 91 जणांचा मृत्यू तर अन्य 59 जण बेपत्ता झाले आहेत.

पूरग्रस्त भागात दुधामध्ये मिसळतंय नदीचे पाणी? VIRAL VIDEOचं हे आहे सत्य

First Published: Aug 14, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading