अयोध्या निकालावर ओवेसी नाराज, पर्यायी जागेबद्दल मुस्लीम पक्षकारांना दिला सल्ला

अयोध्या निकालावर ओवेसी नाराज, पर्यायी जागेबद्दल मुस्लीम पक्षकारांना दिला सल्ला

अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाच्या ताब्यात देऊन मुस्लिमांना 5 एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये वादग्रस्त जागेचा निर्णय अत्यंत संवेदनशील असा होता. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा मालकी हक्क रामलला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला.

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशातील अनेक राजकीय, धार्मिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र एमआयएमच्या अध्यक्ष असददुद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केलं आहे.

आजचा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच वादग्रस्त जागा रामलल्ला न्यासाला देऊन पर्यायी जागा देऊ केली. खरंतर आमची लढाई पर्यायी जागेसाठी कधीच नव्हती असंही ओवेसी म्हणाले.

वाचा ओवेसींनी दिलेली प्रतिक्रिया

-बाबरी मशिदीला आम्ही विसरावं का?

-पाच एकर जमिनीची खैरात नको

-मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी

-आजचा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय

-मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी

-हा देश हिंदूराष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय

-पर्यायी जागेसाठी आमची लढाई कधीही नव्हती

-मशिदीसाठी आम्हाला जमिनीची भीक नको

-इथं मशीद होती हे आम्ही शेवटपर्यंत सांगत राहणार

-कॉंग्रेस आणी भाजपनं कारस्थान करून मशीद पाडली

वाचा : शिया बोर्डानं अशी काय याचिका केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

वाचा : राम जन्मभूमी न्यासाला मिळाली वादग्रस्त 5 एकर जागा!

वाचा : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आहेत 2 पर्याय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या