असदुद्दीन ओवैसींचा मोदींना खोचक प्रश्न, '5 वर्ष देश चालवला की पबजी खेळत होतात?

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 07:38 AM IST

असदुद्दीन ओवैसींचा मोदींना खोचक प्रश्न, '5 वर्ष देश चालवला की पबजी खेळत होतात?

नवी दिल्ली, 24 एप्रिल : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अमित शहा यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकसंदर्भात केलेल्या विधानाचा उल्लेख करत ओवैसी यांनी दौघांवरही शाब्दिक हल्ला केला आहे.

अमित शहांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक कारवाईवरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. यावरून 'पंतप्रधान मोदी पाच वर्ष देश चालवत होते की पबजी खेळ होते?', असा खोचक प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला आहे. ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका करताना ओवैसी यांनी PMOचं अधिकृत अकाउंट पोस्टमध्ये टॅगदेखील केलं आहे.काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील कृष्णा नगर येथील एका जनसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवरून पंतप्रधान मोदींचं प्रचंड कौतुक केलं होतं. 'पंतप्रधान मोदींनी आपलं वायुदल पाठवून पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचं तळ पूर्णतः उद्ध्वस्त केलं. पुलवामा हल्ल्याच्या 13 दिवसांनंतरच बदला घेण्यात आला होता', असं विधान शहा यांनी केलं होतं.

शहा यांच्या या विधानाचा ओवैसींनी समाचार घेत टीकास्त्र सोडलं आहे. 'मोदींची सेना, मोदींचं वायुदल, मोदींचा न्युक्लिअर बॉम्ब, 5 वर्षात जे देशाचं होतं आता ते सर्व काही मोदींचं झालं आहे. देश चालवत होतात की पबजी खेळत होतात?', असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : मोदी आमच्याकडे कधी आले? राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावलेल्या कुटुंबाचा सवाल

नवस फेडण्यासाठी भयंकर कहर, रायगडमधील जत्रेतला VIDEO

VIDEO : राज ठाकरेंकडून भाजपच्या आयटी सेलची पोलखोल, स्टेजवर बोलवलं 'त्या' कुटुंबाला!

VIDEO : 3 वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी सोडलं, कार पुढे जाताच चाकाखाली सापडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 07:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...