• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ओवैसीचा AIMIM पक्ष 100 जागा लढवणार; भाजपची चिंता वाढवणार

ओवैसीचा AIMIM पक्ष 100 जागा लढवणार; भाजपची चिंता वाढवणार

एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आगामी असा एक निर्णय गेतला आहे ज्यामुळे भाजपची चिंता वाढणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून: उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) संदर्भात असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्ष AIMIM 100 जागांवर आपले उमेदवार देणार असल्याचं ओवैसी यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्यांचा पक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांच्या आघाडीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं आहे. ओवैसींनी घेतलेल्या या निर्णयामुळे उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपची (BJP) चिंता वाढणार असे दिसत आहे. ओवैसी म्हणाले, आम्ही आगामी उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पक्षाकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. ओम प्रकाश राजभर यांच्या संकल्प मोर्चा सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. 'राहुल गांधी अफवा पसरवतात' मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानांचा पलटवार, मोदींवरील आरोपाला दिलं प्रत्युत्तर भाजप विरोधात आघाडी तयार करण्यास सुरूवात 20 जून रोजी भारतीय जनता पक्षाचे माजी सहयोगी सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) चे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी दावा केला होता की उत्तरप्रदेशात भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणा असंही त्यांनी म्हटलं होतं. राजभर यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली की, माझा प्रयत्न आहे की ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी एका व्यासपीठावर येऊन उत्तरप्रदेशात भाजप विरोधात मोर्चेबांधणी सुरू करावी. राजभर यांनी म्हटलं होतं की, या संदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. संजय राऊत लवकरच लखनऊ येथे येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: