मराठी बातम्या /बातम्या /देश /

Made in India व्हेंटिलेटर पहिल्यांदाच उपलब्ध; 3000 युनिट अखेर रुग्णालयात

Made in India व्हेंटिलेटर पहिल्यांदाच उपलब्ध; 3000 युनिट अखेर रुग्णालयात

कोरोनाच्या अनेक रुग्णांना तीव्र त्रास संभवतो. त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.

कोरोनाच्या अनेक रुग्णांना तीव्र त्रास संभवतो. त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.

कोरोनाच्या अनेक रुग्णांना तीव्र त्रास संभवतो. त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.

    नवी दिल्ली, 16 जून : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठीची सर्व उपकरणे अधिक संख्येने उपलब्ध असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. मेक इन इंडियाचा (Make in India) एक भाग म्हणून कोविड (साथीच्या रोगाचा) आजार विरूद्ध लढा देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालयांमध्ये स्वदेशी व्हेंटिलेटरचे वितरण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 3000 व्हेंटिलेटर राज्यांना वितरीत करण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर हे कोरोना रूग्णांसाठी आवश्यक जीवनरक्षक वैद्यकीय उपकरण आहे. कोरोनाच्या आजारात काही रुग्णांना तीव्र श्वसन रोग सिंड्रोम (एआरडीएस) होतो. अशांना व्हेंटिलेटरची गरज भासते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 मे रोजी दिलेल्या निवेदनानुसार जून महिन्यापर्यंत 75,000 व्हेंटिलेटरची अंदाजित मागणी दर्शविली होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उत्पादनाचे आदेश देण्यात आले होते. वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "आतापर्यंत देशात तयार होणारी किमान 3000 व्हेंटिलेटर राज्यांना वितरित करण्यात आली आहेत, जी विविध रुग्णालयात ठेवण्यात येतील. काही व्हेंटिलेटर्स अद्याप पाठविणे बाकी आहे." येत्या काही दिवसांत व्हेंटिलेटरचे उत्पादन वेगाने होणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे वाचा-VIDEO - सुशांतच्या मृत्यूमुळे EX गर्लफ्रेंडला धक्का; अशी झाली अंकिताची अवस्था मास्कशिवाय बाहेर पडणं सगळ्यात धोकादायक, पंतप्रधान मोदींनी दिला इशारा
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या