नवऱ्याचा प्रताप! मुल होत नसल्यानं बायकोला तांत्रिकाकडे सोपवलं, गुन्हा दाखल

Rape in Delhi: लग्न होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अपत्य (not having children) होतं नसल्यानं एका पतीनं आपल्या बायकोला चक्क तांत्रिकाच्या हवाली केलं आहे.

Rape in Delhi: लग्न होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अपत्य (not having children) होतं नसल्यानं एका पतीनं आपल्या बायकोला चक्क तांत्रिकाच्या हवाली केलं आहे.

  • Share this:
    दिल्ली, 18 जून: लग्न होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अपत्य (Don't Having children)होतं नसल्यानं एका पतीनं आपल्या बायकोला चक्क तांत्रिकाच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मांत्रिकानं पीडितेच्या पतीची पूर्व परवानगीनं पीडितेवर अनेकदा बलात्कार (Rape on married woman) केला आहे. मांत्रिक आणि पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी पीडितेनं पोलिसांत धाव घेत. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह मांत्रिकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दिल्ली येथील फैयाज अली परिसरात राहणाऱ्या ताहिरचं दीड वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघंही खूप खूश होते. मात्र लग्नाला दीड वर्ष होऊनही मुल होत नसल्यानं ताहिरची निराशा झाली होती. अनेक प्रयत्न करुनही मुल होत नसल्यानं तो त्याला नैराश्य येत होतं. तसेच त्याला लहान मुलांची आवड असल्यानं त्यानं पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासला आहे. मुलाच्या हव्यासापोटी त्यानं आपल्या पत्नीला एका मांत्रिक मित्राकडे सोपवलं आहे. इस्माईल उर्फ भूरा असं संबंधित तांत्रिक मित्राचं नाव असून तो ताहिरच्या घरी नेहमी ये-जा करत असायचा. दरम्यान ताहिरनं त्याला आपल्याला मुलं होत नसल्यानं त्रस्त असल्याचं सांगितलं. यावर तांत्रिक मित्रानं ताहिरला उपाय सुचवला. आपल्या पत्नीचा थोडाही विचार न करता ताहिरही तयार झाला. त्यानं आपल्या बायकोला मांत्रिक मित्राकडे सोपवलं. दरम्यान तांत्रिक मित्रानं त्याच्या बायकोसोबत अनेकदा बलात्कार केला. हेही वाचा-कौमार्यभंगाच्या संशयावरुन नवविवाहितेचा छळ, पतीसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल नवऱ्यानेच मित्राकडे सोपवल्यानं त्याची बायको पूर्णपणे खचून गेली होती. तिला काय करावं हेही सुचत नव्हतं. मात्र काही दिवसांनी आरोपींचा त्रास सहन न झाल्यानं हिंमत एकवटून तिनं याबाबची माहिती आपल्या घरच्यांना दिली. संतापलेल्या घरच्यांनी ताहिर आणि त्याचा मित्र ईस्माईल विरोधात मेरठच्या दिल्ली गेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक मित्र  ईस्माईल आणि ताहिरवर बलात्कार आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सध्या अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published: