आई असल्याने मुलांच्या मृत्यूचं दु:ख कळतं - स्मृती इराणी

आई असल्याने मुलांच्या मृत्यूचं दु:ख कळतं - स्मृती इराणी

बिहारमधल्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात चमकी तापाने आत्तपर्यंत 122 मुलांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

नवी दिल्ली 21 जून :  बिहारमधे चमकी तापाने थैमान घातलंय. आज हा मुद्दा संसदेत उपस्थित झाला आणि सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यसभेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांसाठी दोन मिनीटांचं मौनही ठेवण्यात आलं. कुपोषणाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती  इराणी यांनी दु:ख व्यक्त केलं. आई असल्याने मुलांच्या मृत्यूचं दु:ख मला कळतं, त्याची जाणीव आहे. हा प्रश्न मानवतेचा प्रश्न आहे आणि त्यावर आम्ही उपाययोजना करू असंही त्या म्हणाल्या. बिहारमधल्या मुझफ्फर जिल्ह्यात चमकी तापाने आत्तपर्यंत 122 मुलांचा मृत्यू झालाय.

बिहारच्या मुझप्फरपूर जिल्ह्यात 'चमकी' या तापाने थैमान घातलंय. या तापाने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची संख्या 122 वर गेली आहे. अजुनही हा ताप आटोक्यात आला नसून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय. अ‍ॅक्युट इंसेफलाइटिस सिंड्रोम (AES) असं या तापाला म्हटलं जातं. लहान मुलांना या तापाची लागण होते आणि त्यांची तब्ब्येत झापाट्याने खालावते आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेलंय. सरकार या तापाला आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय.

मुझफ्फरपूरमध्ये प्रकोप

गेल्या काही दिवसांपासून या तापाने डोकं वर काढल्याने मुझफ्फरपूरची चर्चा सर्व देशभर होतेय. जिल्ह्यातल्या सर्व सरकारी दवाखाने भरले असून उपचारासाठी डॉक्टरांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आलीय. सर्वच दवाखाण्यामध्ये दररोज आजारी मुलांचं येणं सुरूच आहे. लिचीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात दरवरर्षी शेकडो मुलं या प्रकारच्या आजाराने बळी पडतात मात्र त्यावर अजुन उपाय सरकारला शोधता आला नाही.

कुपोषीत मुलांनी लिची खाल्ल्यामुळे हा आजार होते अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. कुपोषीत मुलांनी उपोषीपोटी लीची खाल्लीतर त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण झापाट्याने खाली जातं आणि ते आजारी पडतात असं म्हटलं जातं. मात्र डॉक्टरांनी याचं नेमकं कारण काय आहे हे अजुन स्पष्ट केलेलं नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज मुझफ्फरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

कायमस्वरुपी उपाय पाहिजे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच इथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते दवाखाण्यात असतानाच त्याच  दोन मुलांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदतही जाहीर केलीय. मात्र केवळ मदत जाहीर करून आणि थातूरमातूर उपया करून अश घटना थांबणार नाहीत तर त्यावर कायम स्वरुपी आणि दिर्घकालीन उपाय करावे लागतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

घटनेचं राजकारण

यावर आता राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उशीरा मुझफ्फरपूरला भेट दिली नाही अशी टीका विरोधकांनी सुरू केलीय. तर मुख्यमंत्र्यांनी भेट देण्यापेक्षा आजारी मुलांवर उपचार करणं महत्त्वाचं असल्याचं बिहारचे मंत्री शाम रजक यांनी म्हटलं आहे. मुझफ्फरपूरशिवाय इतर जिल्ह्यांमध्येही या तापचं लोण पसरत असल्याचं आढळून आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या