नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारीया यांचा राजीनामा

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारीया यांचा राजीनामा

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यानी आज पदाचा राजीनामा दिलाय. 31 ऑगस्ट हा माझ्या कार्यालयीन कामाचा शेवटचा असेल असंही त्यांनी सांगितलंय. पनगारिया यांचा हा राजीनामा पंतप्रधान मोदींसाठी मोठा धक्का मानला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यानी आज पदाचा राजीनामा दिलाय. 31 ऑगस्ट हा माझ्या कार्यालयीन कामाचा शेवटचा असेल असंही त्यांनी सांगितलंय. पनगारिया यांचा हा राजीनामा पंतप्रधान मोदींसाठी मोठा धक्का मानला जातोय.

त्यांच्या राजीनाम्यामागचं खरं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी त्यांनी पुन्हा स्वतः संशोधन आणि अध्यापनात गुंतवून घ्यायची इच्छा व्यक्त केलीय. पनगारिया हे नीती आयोगाचे पहिलेच उपाध्यक्ष आहेत. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतर युपीएच्या काळातला नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला असून त्याजागी नीती आयोग स्थापन करण्यात आलाय. नीती आयोगाकडूनच देशाची यापुढची ध्येयधोरणं ठरवली जाणार आहेत. अशातच नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी राजीनामा दिल्याने मोदी सरकारला आता या पदासाठी नव्या अर्थतज्ज्ञाचा शोध घ्यावा लागणार आहे.

First published: August 1, 2017, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading