...आणि लग्नाच्या पत्रिकेत लिहिलं I Love Kejriwal

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील दमदार विजयानंतर अनेकांवर त्यांचा प्रभाव दिसून येतोय. तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या केजरीवालांची लोकप्रियता दिवसेंदिवेस वाढत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील दमदार विजयानंतर अनेकांवर त्यांचा प्रभाव दिसून येतोय. तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या केजरीवालांची लोकप्रियता दिवसेंदिवेस वाढत आहे.

  • Share this:
    जोधपूर (राजस्थान) 16 फेब्रुवारी: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Legislative Assembly) अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्या नेतृत्त्वात आम आदमी पार्टीनं AAP मोठ्या मताधिक्यानं पुन्हा विजय मिळवला आहे. अरविंद केजरीवाल सलग तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र या सगळ्यात अरविंद केजरीवाल यांच्या कामावर आणि त्यांच्या साध्या व्यक्तिमत्वावर देशभरातले अनेकजण फिदा असल्याचं पाहायला मिळतं आहे. एवढंच काय तर अरविंद केजरीवाल आता तर लग्नाच्या पत्रिकेतही दिसायला लागले आहेत. अगदी खरं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये असंही पाहण्यात आलं आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेत 'आय लव्ह केजरीवाल' (I love Kejriwal) असं छापलं आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. केजरीवालांचा जबरदस्त प्रभाव दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत राजकारणातले सुपरस्टार झालेल्या आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचं लोकांमध्ये गारुड असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्ल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केजरीवालांच्या या यशाने सर्वच जण प्रभावित आहे झाले आहेत. अरविंद केजरीवांचा हा प्रभाव जोधपूरमध्येही पाहायला मिळाला. केजरीवालांच्या याच जादूच्या प्रभावातील एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते आहे. या लग्नपत्रिकेच्या लिफाफ्यावर 'आय लव्ह केजरीवाल' असं छापलेलं आहे. येणाऱ्या 21 फेब्रुवारीला जोधपूरच्या बालेसरमधील केतू रामनगरमध्ये राहणाऱ्या दुर्गाराम खांभू यांच्या मुलाच्या लग्नाची ही पत्रिका आहे. दुर्गाराम यांच्या मुलगा निलेशचा विवाह लक्षितासोबत होणार आहे. दुर्गाराम यांची आपल्या मुलाच्या पत्रिकेवर केजरीवाल यांच्याविषयी प्रेम दर्शवलं आहे. चर्चेतील लग्नपत्रिका उल्लेखनीय बाब ही आहे की, मागील काही दिवसांपूर्वी करौलीच्या एका वैद्य कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेत आपला अफलातून परिचय देत सगळ्यांना धक्का दिला होता. करोलीच्या एका निवृत्त ज्योतिषी हरिप्रसाद यांनी आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेत आपल्या परिचयामध्ये भन्नाट आणि अनोखी बाबत लिहून जोरदार प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी त्यांचा मुलगा प्रवीणच्या लग्नपत्रिकेत आपण रायबरेली लोकसभा मतदार संघात 1977 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधीविरोधात निवडणूक लढवल्याचं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाची पत्रिका चर्चेत आलीय. प्रवीण याचा विवाह येत्या 25 फेब्रुवारीला होणार आहे.
    First published: