वाजपेयींसाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय

वाजपेयींसाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय

काही वेळापूर्वी वाजपेयींना पाहण्यासाठी केजरीवाल एम्स रुग्णालयात गेले होते

  • Share this:

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट- आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज केजरीवाल यांचा ५० वा वाढदिवस आहे. मात्र एकीकडे भारताचे माजी पंतप्रधान आजारी असताना केजरीवाल यांना आपला वाढदिवस साजरा करणं योग्य वाटलं नाही. काही वेळापूर्वी वाजपेयींना पाहण्यासाठी केजरीवाल एम्स रुग्णालयात गेले होते. यानंतरच केजरीवाल यांचे मीडिया सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी ट्विटरवर केजरीवाल यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले. शर्मा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आप पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे सांगितले आहे. तसेच प्रतिनिधींनी केजरीवाल यांच्या घरीही जाऊ नये.’

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागच्या नऊ आठवड्यांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागच्या २४ तासांमध्ये वाजपेयी यांची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सने सादर केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जितेंद्र सिंग तसेच हर्षवर्धन आणि अश्विनी कुमार चौबे यांनीही एम्स रुग्णालयाला भेट दिली.  मागच्या दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किडनी संसर्गामुळे ११ जूनला वाजपेयींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून मोदींनी एम्स रुग्णालयाला दिलेली ही चौथी भेट आहे.

VIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

मोदींच्या आधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे. २००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत. डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश. या आजारामध्ये वाढत्या वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते.

हेही वाचा-

VIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

वाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर

AtalBihariVajpayee Health Update : मोदी पुन्हा पोहोचले एम्सला, दुपारी अडीच वाजता येणार मेडिकल बुलेटिन

First published: August 16, 2018, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading