नायब राज्यपाल दिल्लीचे बॉस; आप सरकारला मोठा धक्का

नायब राज्यपाल दिल्लीचे बॉस; आप सरकारला मोठा धक्का

दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

  • Share this:

14 फेब्रुवारी, दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. मागील काही दिवसांपासून नायब राज्यपाल आणि आप सरकारमध्ये वाद सुरू आहे. नायब राज्यपालांच्या आडून केंद्र सरकार दिल्लीवर कंट्रोल करू पाहत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर हे सारं प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं आप सरकारला मोठा धक्का दिला आहे.

'आप'ला धक्का

सकाळी 10.30 वाजता सुनावणीला सुरूवात झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली पोलिसांवर राज्य नाही तर केंद्र सरकारचं नियंत्रण असेल, असे स्पष्ट केलं. शिवाय, अॅन्टी करप्शन ब्युरोचं कंट्रोल हे नायब राज्यपालांकडे असेल असं सांगितले. तसेच नायब राज्यपाल अनिल बैजल हे स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची मदत आणि सल्ला घ्यावा लागेल, असं देखील न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपाठासमोर ही सुनावणी पार पडली.

दिल्ली सरकारच्या हाती कोणते निर्णय

यावेळी निर्णय देताना जमिन, वीज आणि शेतकऱ्यांसंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार हे दिल्ली सरकारच्या हाती असतील असं देखील यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. पण, मतभेद झाल्यास नायब राज्यपालांचा निर्णय हा अंतिम राहिल असं देखील यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

न्यायाधीशांमध्ये मतभेद

दरम्यान, याप्रकरणी सुनावणी करताना दोन्ही न्यायधीशांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे काही निर्णयांवरील सुनावणी ही तीन सदस्यीय खंडपीठासमोर पार पडेल असं देखील यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं.

'तारीख पे तारीख'

न्यायालयाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्षानं दामिनी चित्रपटातील सनी दोओलचा डायलॉग ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

">

दरम्यान, दिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमधील वाद उफाळून आल्यानंतर तत्कालीन नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं अनिल बैजल यांची नियुक्ती केली होती.

First published: February 14, 2019, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading