अरविंद केजरीवाल यांची 'आप'च्या नेतेपदी निवड, 16 फेब्रुवारीला घेणार शपथ

अरविंद केजरीवाल यांची 'आप'च्या नेतेपदी निवड, 16 फेब्रुवारीला घेणार शपथ

या आधी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम त्यांनी 14 फेब्रुवारीलाच घेतले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेलाच शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

  • Share this:

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत दुसऱ्यांदा विक्रमी बहुमत मिळालं. त्यानंतर केजरीवाल हे 'व्हॅलेंटाईन डे'ला शपथ घेतील असं बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर झालीय. केजरीवाल हे आपल्या मंत्रिमंडळासह 16 फेब्रुवारीला शपथ घेतील. रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. केजरीवाल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन त्यांना सरकार बनविण्याचा दावा सादर केला आणि तारखेचीही माहिती दिली. केजरीवालांसाठी व्हॅलेंटाईल डे खास असल्याने ते याच दिवशी शपथ घेतील असं म्हटलं जात होतं मात्र आता तारीख जाहीर झाल्याने तो समज खोटा ठरलाय.

आज सकाळी सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात केजरीवालांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं. याच बैठकीत त्यांची आप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शपथ घ्यावी असा आग्रह काही आमदारांचा होता. मात्र काहींनी 16 तारीख सुचवली. शेवटी 16 तारीख ठरविण्यात आल्याचं आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी सांगितलं.

असं आहे व्हॅलेंटाईन कनेक्शन

केजरीवाल यांना बहुमत मिळालं तर ते 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. असून त्यांचं आणि व्हॅलेंटाईन डेचं खास कनेक्शन असल्याचं मानलं जात होतं.

व्हॅलेंटाईन डे 2013

दिल्ली विधानसभेत 2013मध्ये पहिल्यांदाच 'आप'ला सत्ता मिळाली होती. यावेळी 'आप'ला 28, भाजपला 31 आणि काँग्रेसला 08 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या मदतीने अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र हे सरकार फक्त 49 दिवसच टिकलं. केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच राजीनामा दिला होता. 'आप'चं हे सरकार चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं.

निकाल येण्याआधीच भाजपने स्वीकारला पराभव? जाणून घ्या VIRAL फोटोचं सत्य

व्हॅलेंटाईन डे 2015

यावर्षी झालेल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 'आप'चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी घोषणा केली होती की, आपला जर लोकांनी संधी दिली तर ते 14 फेब्रुवारीला रामलीला मैदानावरच शपथ घेतील. लोकांनी 'आप'वर विश्वास टाकत भरभरून 67 जागा दिल्या. तर भाजपला फक्त 03 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला आपलं खातं खोलता आलं नाही. त्यावेळी केजरीवालांनी पूर्णबहुमताच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून 14 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

LIVE Delhi Result: दिल्लीत 'आप' करणार हॅट्रीक, भाजपचं स्वप्न भंगणार

व्हॅलेंटाईन डे 2018

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी आपने एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि व्हॅलेंटाईन डे चं खास कनेक्शन असल्याचं मानलं जातंय.

First published: February 12, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या