नवी दिल्ली, 4 मे : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रोड शो मध्ये थोबाडीत मारण्याची घटना घडली आहे. कर्मपुरा भागात रोड शो करत असताना एका इसमाने त्यांच्यावर हा हल्ला केला.अरविंद केजरवाल मतदारांना अभिवादन करत असताना एक जण त्यांच्या कारवर चढला आणि त्याने त्यांच्या थोबाडीत मारली.
सुरेश नावाच्या या इसमाने हा हल्ला केला, असं पुढे येत आहे. सुरेश हा कैलाश पार्कमध्ये राहणारा आहे. तो स्पेअर पार्ट जोडण्याचं काम करतो. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
याआधीही हल्ले
अरविंद केजरीवाल यांच्यावर याआधीही अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळेच त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हे हल्लेखोर भाजपशी संबंधित असावेत,असाही आरोप आप च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये गेल्याच आठवड्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर दक्षिणपुरी भागात असा हल्ला झाला होता.
वाराणसीत शाईहल्ला
मागच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्येही अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांच्यावर बूट फेकण्याचीही घटना घडली होती. केजरीवाल यांच्यावर वारंवार असे हल्ले होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
====================================================================================
VIDEO: रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली