राजीव गांधींच्या 'भारतरत्न'वरून 'आप'मध्ये वाद, महिला आमदाराचा राजीनामा

शिख समुदाय हा आपचा खूप मोठा मतदार आहे. त्यामुळं सहानुभूती मिळविण्यासाठी ही खेळी खेळली गेली असावी असंही बोललं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 10:53 PM IST

राजीव गांधींच्या 'भारतरत्न'वरून 'आप'मध्ये वाद, महिला आमदाराचा राजीनामा

नवी दिल्ली 21 डिसेंबर : दिल्लीत 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची धग अजून शमलेली नाही. दिल्ली विधानसभेत शुक्रवारी 'आप'ने प्रस्ताव मंजूर करून राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा असा प्रस्ताव मंजूर केला अशी माहिती आपचे आमदार जर्नेलसिंह यांनी दिली. त्यावर वाद सुरू होताच मंत्री सोमनाथ भारती यांनी ट्विट करून मुळ प्रस्तावात अशी कुठलीही मागणी नाही असं स्पष्ट केलं. मात्र आपच्या आमदार अलका लांबा यांनी भारतरत्न पुरस्कार मागे घ्यावा असाच प्रस्ताव असावा असं सांगत पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

आगामी निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर नुकताच लगालेला निकाल यावरून राजकरण सुरू झालंय. काँग्रेसचे नेते सज्जनसिंग यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिख समुदाय हा आपचा खूप मोठा मतदार आहे. त्यामुळं सहानुभूती मिळविण्यासाठी ही खेळी खेळली गेली असावी असंही बोललं जातंय.
Loading...

त्यावेळी राहुल लहान होते - चिदंबरम

कांग्रेस सत्तेवर असताना 1984 साली देशात शिख संप्रदायाविरोधात दंगली उसळल्या होत्या. देशासाठी ही अत्यंत खेदजनक बाब होती. मात्र, आता राहुल गांधी यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. कारण त्यावेळेस ते लहान होते अशी सावध प्रतिक्रिया माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच दिली होती.कोलकात्यात पार पडलेल्या एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ही खेदजनक बाब कांग्रेसच्या कार्यकाळात घडली आहे आणि त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह यांनी संसदेत माफीसुद्धा मागितलीय. पण, आता त्या दंगलींसाठी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही, कारण ते त्यावेळेस 13 - 14 वर्षांचेच होतेच.


आत्तापर्यंत नेमकं काय झालं?


-1984ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या


-हत्येनंतर शीखविरोधी दंगल


-न्या. जी.टी.नानावटी आयोगाने सूचना केल्यानंतर गुन्हा दाखल


-सज्जन कुमार ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात गुन्हा


-हत्येचा आणि दंगल घडवण्याचा गुन्हा दाखल


-जानेवारी 2010 मध्ये सीबीआयकडून आरोपपत्र दाखल


-कनिष्ठ न्यायालयाकडून सज्जन कुमार दोषमुक्त


-अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा हायकोर्टात दावा


-17 डिसेंबर 2018 - हायकोर्टाकडून सज्जन कुमार दोषी


-सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...