Elec-widget

MEME मुळे अडचण; या 'स्वस्तिक'च्या मेसेजमुळे केजरीवालांवर 'ट्रोल धाड'

MEME मुळे अडचण; या 'स्वस्तिक'च्या मेसेजमुळे केजरीवालांवर 'ट्रोल धाड'

कुणीतरी फॉरवर्ड केलेलं... असा मेसेज लिहून अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट केलं आणि या मीमनंतर त्यांना सोशल मीडियावर जबरदस्त टीकेला तोंड द्यावं लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : कुणीतरी फॉरवर्ड केलेलं... असा मेसेज लिहून अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट केलं आणि त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर जबरदस्त टीकेला तोंड द्यावं लागत आहे. हा मेसेज म्हणजे एक मीम होतं आणि त्यात हातात एक झाडू घेतलेली छायाकृती स्वस्तिकच्या छायाकृतीच्या मागे लागते असं दिसतं.



Loading...

अरविंद केजरीवाल यांनी कुणीतरी फॉरवर्ड केलेला मेसेज असं म्हटलं असलं तरी हे चित्र वादग्रस्त ठरलं आहे. झाडू हे केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. स्वस्तिक म्हणजे हिंदुत्ववादाचं प्रतीक समजलं जातं, असं म्हणत अनेक उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांवर टीका केली. केजरीवालांवर या ट्वीवरून शरसंधान साधणाऱ्यांमध्ये अनेक भाजपचे नेते आहेत.




ट्विटरवरची ही ट्रोलधाड बघता 'आप'ने याविषयी लगेचच स्पष्टीकरण दिलं. स्वस्तिक हे नाझीवादाचं प्रतीक आहे, असं आपने म्हटलं आहे. केजरीवालांनी ट्वीट केलेलं चित्र हे स्वस्तिकच आहे. नाझी स्वस्तिक उलटं असतं, असं म्हणत ट्विटरकरांनी या स्पष्टीकरणालाही गुंडाळून ठेवलं आहे.


SPECIAL REPORT: आंबेडकरांचा उमेदवार 'जात' फॉर्म्युला वादात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...