मोदींवर टीका करताना केजरीवालांनी सांगितली भाजपला मतदान करणाऱ्या तरुणाची STORY

अरविंद केजरीवाल यांनी एका तरुणाची गोष्ट सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 10:41 AM IST

मोदींवर टीका करताना केजरीवालांनी सांगितली भाजपला मतदान करणाऱ्या तरुणाची STORY

नवी दिल्ली, 18 मार्च : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी एका तरुणाची गोष्ट सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.

'29 वर्षांचा एक तरुण भेटला. 24 वर्षांचा असताना त्याने मोदींना मतदान केलं होतं. कारण मोदींनी म्हटलं होतं रोजगार दिला जाईल. परंतु तो तरुण अजूनही बेरोजगार आहे. ना नोकरी मिळाली ना लग्न जमलं. आता पुन्हा एकदा मोदींना मत दिलं तर पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याचं वय 34 होईल, आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. यावेळी पुन्हा चूक करू नका,' असं आवाहन ट्विटरवरून अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्धावर शाब्दिक हल्ला करताना दिसत आहे. मागील निवडणुकीतही अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. तसंच केजरीवाल यांनी वाराणसी या मतदारसंघातून मोदींना आव्हानही दिलं होतं. त्यामुळे यावेळीही या दोन नेत्यांमधील सामना रंजक ठरणार आहे.Loading...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

बिहारमधील पाटणा साहिब या जागेवरून भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे बंडखोरी करतील, अशी चिन्ह आहेत. त्यामुळे या जागेवरून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे भाजपकडून मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. मात्र आता या मतदारसंघातून संबित पात्रा हे भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षकाने दिला सेक्स क्लास, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...