19 मार्च: नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी नितीन गडकरींची माफी आता अरविंद केजरीवालांनी मागितली आहे. तसं पत्रही त्यांनी केंद्रात मंत्री असलेल्या गडकरींना लिहिलं आहे.
केजरीवाल यांनी गडकरी यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. पूर्ती घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी गडकरींवर 2014 साली लावले होते. आता मात्र केजरीवालांनी माफी मागून हे प्रकरण बंद करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहमतीसाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान माजिठिया यांची माफी मागितल्यामुळे त्य़ांच्या पक्षातून विद्रोह सुरू आहे. मुख्यमंत्री नितीन गडकरी यांच्या भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांमधील यादीत सामील असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.
(सविस्तर वृत्त लवकरच)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, India, अरविंद केजरीवाल, देश, नितीन गडकरी, महाराष्ट्र