नायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवालांचा मंत्र्यांसोबत ठिय्या, या आहेत मागण्या

नायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवालांचा मंत्र्यांसोबत ठिय्या, या आहेत मागण्या

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री सोमवारी संध्याकाळपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री सोमवारी संध्याकाळपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या ऑफिसात अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपराष्ट्रपती मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि गोपाल राय अशा अन्य मंत्र्यांसोबत घरणे आंदोलनाला बसले आहे. आज त्यांच्या या आंदोलनाची दुसरी रात्र आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अरविंद केजरीवाल यांनी मांडली आहे. आयएएस अधिकार्यांनी चार महिन्यांपासून पूकारलेल्या संपाला मागे घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावे अशी मागणी करत त्यांवी ठिय्या आंदोलन केलं आहे.

या आंदोलनादरम्यान अनेक कामांचा खोळंबा झाला आहे, त्यामुळे काम थांबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणीही केजरीवाल नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, केजरीवालांनी विनाकारण धरणे आंदोलन केलं अशी टीका नायब राज्यपालांनी केली आहे. तर दिल्लीकरणांना सुविधा मिळण्यासाठी आणि सरकारी कामकाज पुन्हा सुरळीत होण्यासाठी आंदोलन करणं महत्त्वाचं असल्याच केजरीवालांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे भाजपने आगमी लोकसभा निवडणुकींपूर्वी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला तर मी स्वत: या निवडणुकांमध्ये भाजपचा प्रचार करेन असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

First published: June 13, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading