आरूषीचे आईवडील जेलबाहेर

आरूषीचे आईवडील जेलबाहेर

गाझियाबादमधल्या दासना तुरुंगातून जेलमधून त्यांची आज सुटका झाली आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 16 ऑक्टोबर: आपल्याच मुलीच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आरुषीचे आईवडील डॉ. नुपूर आणि राजेश तलवार चार वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आलेत. गाझियाबादमधल्या दासना तुरुंगातून जेलमधून त्यांची आज सुटका झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अलाहबाद हायकोर्टाने त्यांना निर्दोष करार दिल. त्यानंतर त्यांची आज जेलमधून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेवेळी तुरुंगाबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. . तुरुंगातून सुटल्यानंतर तलवार दाम्पत्य देवदर्शन घेणार आहे. त्यानंतर नोएडामध्ये नुपूर तलवार यांच्या घरी कुटुंबीयांचं स्नेहभोजन होणार आहे. पूराव्यांअभावी आरुषीच्या आई-वडीलांना अलहाबाद कोर्टाने निर्दोष सुटका केली होती. आरूषीची हत्या 2008 साली तिच्या राहत्या घरी करण्यात आली होती.त्यानंतर सुप्रीम कोर्टाने तिच्या आई वडिलांना दोषी करार दिला होता.

या दोघांना पुराव्यांअभावी सुटका जरी झाली असली तरी आरूषीची हत्या नक्की कोणी केली हे रहस्य मात्र अजूनही उलगडलेलं नाही.

First published: October 16, 2017, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading