AN - 32 विमान अपघात : ते शोधपथक अजूनही जंगलातच पडलं अडकून

भारतीय हवाई दलाचं AN - 32 हे विमान अरुणाचल प्रदेशमधल्या डोंगराळ भागात बेपत्ता झालं होतं. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह काढण्यासाठी 12 जणांचं एक पथक पाठवण्यात आलं होतं. पण आता प्रतिकूल हवामानामुळे हे 12 जणही या दुर्गम भागात अडकून पडले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 07:19 PM IST

AN - 32 विमान अपघात : ते शोधपथक अजूनही जंगलातच पडलं अडकून

नवी दिल्ली, 29 जून : भारतीय हवाई दलाचं AN - 32 हे विमान अरुणाचल प्रदेशमधल्या डोंगराळ भागात बेपत्ता झालं होतं. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह काढण्यासाठी 12 जणांचं एक पथक पाठवण्यात आलं होतं. पण आता प्रतिकूल हवामानामुळे हे 12 जणही या दुर्गम भागात अडकून पडले आहेत.

गेले 9 दिवस हे पथक 12 हजार फूट उंचीवर अडकून पडलं आहे. या पथकामध्ये हवाई दल आणि लष्कराच्या जवानांबरोबरच गिर्यारोहकही आहेत.

विषारी सापांचा धोका

या पथकाला विषारी सापांचा धोका आहे. तसंच इथे काही खायलाही उपलब्ध नाही. प्रतिकूल हवामानामुळे इथे रसद पोहोचवणंही कठीण झालं आहे. आता वातावरण बदलल्यानंतरच या पथकाला हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करावं लागेल.

या पथकातल्या सगळ्या जणांना 12 जूनला अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात 'एअरड्रॉप' करण्यात आलं होतं. तेव्हापासून हे जवान याच भागात आहेत.

Loading...

3 जूनला विमान बेपत्ता

भारतीय हवाई दलाच्या AN - 32 या विमानाने आसाममधल्या एअरबेसवरून उड्डाण केलं होतं. या विमानात 13 जण होते. हे विमान 3 जूनला बेपत्ता झाल्यानंतर अनेक दिवस या विमानाचा शोध सुरू होता. तब्ब्ल नऊ दिवसांनी अरुणाचल प्रदेशच्या जंगलात या विमानाचे अवशेष सापडले.

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी सियांग जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये एक पथक पाठवण्यात आलं होतं. या पथकाने अपघातग्रस्त विमानातले 13 मृतदेह बाहेर काढले. पण त्यानंतर लगेचच हवामान बिघडलं. त्यामुळे हे पथक तिथेच अडकून पडलं.

सुषमा स्वराज यांनी स्वत:हून सोडला सरकारी बंगला

अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या धुवाँधार पाऊस सुरू आहे. इथल्या डोंगराळ भागात 140 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. या जोराच्या वाऱ्यामुळे विमानांची उड्डाणंही शक्य नाहीत. इथे दूरदूरपर्यंत जंगल आहे. त्यामुळे या पथकाला तातडीची मदत पोहोचवण्यातही अनेक अडचणी आहेत.

============================================================================================

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...