राहुल गांधींना लढाऊ विमान म्हणजे काय हे तरी कळतं का? - अरुण जेटली

राहुल गांधींना लढाऊ विमान म्हणजे काय हे तरी कळतं का?  - अरुण जेटली

राफेल प्रकरणावरचा राहुल गांधी यांचा प्रत्येक शब्द हा खोटा आहे असा आरोप अरुण जेटली यांनी केला.

  • Share this:

नवी दिल्ली 2 जानेवारी : राफेल खरेदीच्या प्रश्नावर लोकसभेत झालेल्या चर्चेत आज भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुगलबंदी झाली. जुन्याच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी यांना लढाऊ विमानातलं काहीही कळत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द हा खोटा आहे असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच्या सदस्यांनीही जेटलींच्या भाषणांदरम्यान जोरदार अडथळे आणले.

काय म्हणाले जेटली?

- या देशातल्या काही घराण्यांना फक्त पैशाचं गणित कळतं.

- काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काहीही देणं घेणं नाही.

- कारगील युद्धाच्यावेळी देशाच्या लष्कराजवळ पुरेशी शस्त्र नव्हती.

- युपीए सरकाने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली.

- 15 वर्षांपूर्वी राफेलचा करार केला होता. पण काहीही झालं नाही.

- देशाला ही निर्णय प्रक्रिया परवडणारी नाही.

- बोफोर्स प्रकरणातही अनेक नावं आली होती. ती पुन्हा घ्यायची का?

- सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतरही काँग्रेस देशाचा वेळ घालवत आहे.

- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आई आणि मुलगा जामीनावर आहेत. सार्वजिनिक संपत्तीचं त्यांनी खासगी संपत्तीत रुपांतर केलंय.

- भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला काहीही अधिकार नाही.

या आधी झालेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

राहुल यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही - राहुल गांधी

पंतप्रधानां सर्वांसमोर येवून बोलण्याची हिंम्मत नाही.

राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला. फक्त 36 विमानं खरेदी करण्याचा करार का करण्यात आला?

राफेलच्या किंमती का वाढल्या. काही कंपन्यांनाच का निवडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील - राहुल गांधी

First published: January 2, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading