आधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

आधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा,  जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

उपचारासाठी अमेरिकेत गलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 17 जानेवारी : उपचारासाठी अमेरिकेत गेलेल्या अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काही लोकांना पुन्हा NDAचं सरकार यायला नको असं वाटतं. त्यामुळे त्यांनी दुष्पप्रचार सुरू केलाय. कुठल्याही गोष्टींवरून ते अपप्रचार करतात आणि केंद्र सरकर आणि पंतप्रधानांना त्यात ओढण्याचा प्रयत्न करतात असं जेटलींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

गुरुवारी जेटलींनी  फेसबुकवर ब्लॉग लिहिला आणि त्यात सीबीआय, राफेल, नोटबंदी, जस्टिस लोया, सुप्रीम कोर्ट अशा सगळ्या वादग्रस्त विषयांचा आढावा घेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

सीबीआय प्रकरणी केंद्रावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या आतमध्ये बघितलं पाहिजे. सीबीआय सारख्या संस्थेत जर अंदाधुंदी माजली असताना सरकारनं स्वच्छता करायची नाही तर काय करायचं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

जेटलींना काय झालं?

अरुण जेटली वैद्यकीय उपचारासाठी रविवारी अमेरिकेला गेले आहेत. 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्यांना अमेरिकेत राहावं लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचं किडणी प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प नक्की कोण मांडणार याची उत्सुकता निर्माण झालीय.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटलींच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी म्हणाले, " जेटलीजींची प्रकृती ठिक नाही असं कळल्याने मी व्यथीत झालोय. आम्ही दररोज भांडत असू , मात्र या कठिण काळात मी आणि काँग्रेस पार्टी 100 टक्के तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रकतीत सुधारणा होवो अशी सदिच्छा" असं ट्विट करून राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

First published: January 17, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading