देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींची ग्वाही

देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींची ग्वाही

न्यूज18 समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचं वृत्त ही त्यांनी फेटाळून लावलंय.

  • Share this:

03 फेब्रुवारी :  देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींनी ग्वाही दिलीय.  न्यूज18 समुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. तेलाचे चढे भाव चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. कच्चं तेल 60 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत राहिल्यास जीडीपी वाढणार ही अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.

न्यूज18 समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचं वृत्त ही त्यांनी फेटाळून लावलंय. जोपर्यंत सर्व पक्षांची सहमती होत नाही तोपर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असं सांगितलं.

दुसरीकडं कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलंय. कच्च्या तेलाच्या किंमती 60 डॉलर प्रतिबॅरल राहणं, समाधानकारक मान्सून राहिल्यास देशाचा जीडीपी चढता राहील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.

राजस्थान पोट निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही त्यामागची कारण शोधतोय, असं अरुण जेटली म्हणाले.

First published: February 3, 2018, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading