निवडणुकीच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना GSTमध्ये सूट, हे आहेत 4 महत्त्वाचे बदल

महसुलात वाढ झाल्यावरच आणखी सुट देण्यात येईल अशी माहितीही जेटली यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 04:29 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना GSTमध्ये सूट, हे आहेत 4 महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली 10 जानेवारी : GST कॉन्सिलची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. GST कॉन्सिलची ही 32 वी बैठक होती. लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिलेले असताना या बैठकीत व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित होते. आणि त्यात एकमताने निर्णय घेतले गेले.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली.


व्यापाऱ्यांसाठी GST ची मर्यादा आता 40 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. सुरूवातीला ही मर्यादा 20 लाखांपर्यंत होती. म्हणजे ज्या व्यावसायिकांची उलाढाल 20 लाखांपर्यंत होती त्यांना GST च्या नियमांनुसार सर्व कर आणि रिटर्न्स भरावे लागत होते. नव्या निर्णयामुळे ती मुदत 40 लाखांवर गेलीय. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.


आता छोट्या व्यावसायिकांनाकॉम्पोझिशन स्किमचाही फायदा घेता येणार आहे. त्याची मर्यादा वाढवून ती आता दीड कोटी करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी असलेल्यांना आता दर तीन महिन्याला टॅक्स भरावा लागेल, मात्र रिटर्न्स हे वर्षातून एकदाच भरावे लागतील. 1 एप्रील 2019 पासून हा नियम लागू होणार आहे. या नियमामुळे व्यापारांचा त्रास कमी होईल.

Loading...


रिअल इस्टेट क्षेत्रातले दर ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महसुलात वाढ झाल्यावरच आणखी सुट देण्यात येईल अशी माहितीही जेटली यांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यातचं जीएसटीचं उत्पन्न सरासरी 97 हजार कोटी रुपये असल्याची माहिती महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी दिली.

Special Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...