धक्कादायक निकाल! भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांचा झाला होता 2014मध्ये पराभव

धक्कादायक निकाल! भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांचा झाला होता 2014मध्ये पराभव

2014मधील काही निकाल हे धक्कादायक असेच होते.

  • Share this:

अमृतसर, 24 मार्च : 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 282 जागा जिंकत सत्ता स्थापन केली. मित्र पक्षांचा विजय देखील तितकाच महत्त्वाचा होता. मोदी लाटेत भाजपनं केलेली कामगिरी न भूतो अशीच होती. या निवडणुकीमध्ये काही धक्कादायक निकाल देखील लागले. कारण,  अरूण जेटली यांचा अमृतसर या लोकसभा मतदार संघातून पराभव झाला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग हे यावेळी जायंट किलर ठरले होते. अमरिंदर सिंग यांनी अरूण जेटली यांचा 1 लाख 27 हजार 770 मतांनी पराभव केला होता. अमरिंदर सिंग यांना 4 लाख 82 हजार 876 मतं मिळाली होती. तर, अरूण जेटली यांना 3 लाख 80 हजार 106 मतं मिळाली होती. मोदी लाटेत देखील अरूण जेटली यांचा झालेला पराभव हा धक्कादायक असाच होता.

2009मध्ये भाजपचे 113 खासदार होते. तर, 2014मध्ये हीच संख्या 282 झाली होती. त्यामुळे भाजपच्या झंझावाताचा अंदाज येतो.


भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला; भाजपची सहावी यादी जाहीर, हे आहेत उमेदवार


यंदा कोण मारणार बाजी?

यंदाच्या निवडणुकीकरता सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. भाजपनं देखील आम्हाला 2014 प्रमाणे यश मिळेल असा दावा केला आहे. सर्व विरोधक एकत्र आले असून त्यांनी भाजपविरोधात हाक दिली आहे. राफेल करार, नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या मुद्यांचा वापर करत विरोधक सध्या भाजपला लक्ष्य करताना दिसत आहेत.

देशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO: 'राहुल शेवाळेंना आर्शिवाद आहेच पण उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद मला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या